Advertisement

जप्त मास्क, सॅनिटायझर लोकांना उपलब्ध करा; उच्च न्यायालयाचे आदेश

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पीपीई कीट्स, हँड सॅनिटायझर, मास्क आदींची साठेबाजी व काळाबाजार होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पीपीई कीट्स, हँड सॅनिटायझर, मास्क जप्त केले.

जप्त मास्क, सॅनिटायझर लोकांना उपलब्ध करा; उच्च न्यायालयाचे आदेश
SHARES

पोलिसांनी जप्त केलेले पीपीई कीट्स, हँड सॅनिटायझर, मास्क आता तातडीने उपलब्ध करून द्यावेत असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. जप्त केलेले हे साहित्य उपलब्ध करूण देण्याची मागणी करणारी जनहित याचिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व माजी आमदार मोहन जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने हे आदेश दिले. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पीपीई कीट्स, हँड सॅनिटायझर, मास्क आदींची साठेबाजी व काळाबाजार होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पीपीई कीट्स, हँड सॅनिटायझर, मास्क जप्त केले. मात्र, आता याच उपकरणांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जप्त केलेल्या या वस्तूंचा वापर डॉक्टर, आरोग्य, कर्मचारी, सफाई कामगार यांच्यासाठी करावा, अशी मागणी 
या जनहित याचिकेत करण्यात आली होती. 

या याचिकेवर  उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.पी.कोलाबावाला यांच्या न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाने राज्यात किती पीपीई कीट्स, हँड सॅनिटायझर, मास्क जप्त केले आहेत, त्याची माहिती सादर करण्याचे आदेश सरकारला दिल्याची माहिती जोशी यांनी दिली.

कोरोना संसर्गजन्य रोग असल्याने डॉक्टरांनाही रुग्णांवर उपचार करताना या साहित्याची गरज आहे. आता त्याचा तुटवडाही जाणवू लागला आहे. त्यामुळे  पोलीस खात्याने जप्त केलेले पीपीई कीट्स, मास्क, हँड सॅनिटायझर तातडीने वापरात आणण्याबाबत जनहित लक्षात घेऊन न्यायालयानेच याबाबत निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात याचिकेत करण्यात आली होती. 



हेही वाचा  -

EXCLUSIVE : बोंबील ऑन डिमांड! ताजा म्हावरा तुमच्या दारात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलांवामध्ये जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा