Advertisement

देशात सापडला कोरोनाचा नवा ‘AP स्ट्रेन’; आधीच्या स्ट्रेनपेक्षा १५ टक्के जास्त भयंकर

भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. आंध्र प्रदेशात या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले असून त्याला ‘एपी’ स्ट्रेन असं नाव देण्यात आलं आहे. हा नवा व्हेरियंट इतर स्ट्रेनच्या तुलनेत १५ टक्के जास्त संसर्गजन्य आहे.

देशात सापडला कोरोनाचा नवा ‘AP स्ट्रेन’; आधीच्या स्ट्रेनपेक्षा १५ टक्के जास्त भयंकर
SHARES

भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. आंध्र प्रदेशात या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले असून त्याला ‘एपी’ स्ट्रेन असं नाव देण्यात आलं आहे. वैज्ञानिक भाषेत या स्ट्रेनला N440K व्हेरियंट असं म्हटलं जात आहे. 

सेंटर फॉर सेल्यूअर अॅट मॉलिक्यूलर बायोलॉजी  (CCMB)च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा नवा व्हेरियंट इतर स्ट्रेनच्या तुलनेत १५ टक्के जास्त संसर्गजन्य आहे. या स्ट्रेनमुळे अवघ्या ३ ते ४ दिवसांत रुग्ण गंभीर आजारी होत आहेत. 

हा नवा स्ट्रेन सर्वात पहिल्यांदा आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये आढळला होता. ‘एपी’ स्ट्रेन आधी आढळलेल्या B1.617 आणि B1.618 पेक्षा जास्त शक्तीशाली आहे.

हेही वाचा- “जावडेकरांचा खोटारडेपणा उघड, महाराष्ट्रात कोरोना लसींचा अपव्यय सर्वात कमी”- सचिन सावंत

यासंदर्भात अधिक माहिती देताना विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी वी. विनय चंद यांनी सांगितलं की, या नवीन स्ट्रेनचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्यांचं परिक्षण CCMB मध्ये केलं जात आहे. व्हायरसचा हा स्ट्रेन खूपच लवकर विकसित होत असून अत्यंत कमी वेळेत तो संसर्ग पसरवतो. या स्ट्रेननं केवळ ३ ते ४ दिवसात लोकांना  गंभीर आजारी केलं आहे.

भारतात सर्वात पहिल्यांदा SARS-CoV-2  हा व्हेरियंट दिसून आला होता. सोबतच E484Q आणि L452R हे दोन स्ट्रेनही आढळून आले आहेत. हे दोन्ही स्ट्रेन इंग्लंडमधील स्ट्रेनशी संबंधीत आहेत. डिसेंबर २०२० पासून महाराष्ट्रात या स्ट्रेनचे रुग्ण आढळून येत आहेत. या स्ट्रेनमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होत आहे. २० टक्के प्रकरणांमध्ये व्हायरस म्यूटेंट झाला असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केलं जात आहेत. 

या स्ट्रेनमुळे अधिकाधिक लोकं संक्रमित होऊ नये म्हणून लसीकरण हाच त्यावरील एकमात्र उपाय आहे. लसीकरणाच्या आधारेच या स्ट्रेनचा फैलाव आपण रोखू शकतो, असंही ते म्हणाले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा