Advertisement

“जावडेकरांचा खोटारडेपणा उघड, महाराष्ट्रात कोरोना लसींचा अपव्यय सर्वात कमी”- सचिन सावंत

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक लस वाया जात असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी मोदी सरकारमधील मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला होता.

“जावडेकरांचा खोटारडेपणा उघड, महाराष्ट्रात कोरोना लसींचा अपव्यय सर्वात कमी”- सचिन सावंत
SHARES

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक लस वाया जात असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी मोदी सरकारमधील मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला होता. मात्र मोदी सरकारच्याच माहितीने त्यांचा हा खोटारडेपणा उघड झाला असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय माहिती व प्रसरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत लशींच्या पुरवठ्याच्या मुद्दावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. केंद्र सरकारकडून सर्वाधिक लस या महाराष्ट्रालाच पुरवण्यात आलेल्या आहेत. तरीही महाविकास आघाडी सरकार लशींवरून राजकारण करत आहे. उलट महाराष्ट्राने ६ टक्के अर्थात ५ लाख लसीचे डोस वाया घालवल्याचा दावा देखील जावडेकर यांनी केला होता.

हेही वाचा- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन!

त्याला आता केंद्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सचिन सावंत यांनी उत्तर दिलं आहे. प्रकाश जावडेकरजी महाराष्ट्रातील लशींचा अपव्यय ०.२२% आहे, तुमच्या खोटेपणानुसार ६% नाही. मोदी सरकारच्याच माहितीने तुमचा खोटारडेपणा उघड झाला. आम्हाला आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे. ज्यांनी लसीकरणात महाराष्ट्राला १ल्या क्रमांकाचं राज्य बनवलं व लशींचा कमीतकमी अपव्यय ठेवला.

दु:ख याचे वाटते की महाराष्ट्र भाजपचे तुमच्यासारखे नेते राजकारणासाठी महाराष्ट्राचा अपमान व निंदा करीत आहात. गंभीर बाब - महाराष्ट्रात फक्त २३५४७ लशी शिल्लक आहेत. मोदीजी वेळेवर लशी देत नसतील तर आम्ही जनतेची सेवा कशी करावी? महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा मोदींना लशी देण्यास सांगा, असा टोला देखील सचिन सावंत यांनी लगावला आहे.

(sachin sawant slams prakash javadekar on covid 19 vaccine wastage in maharashtra)

हेही वाचा- महाराष्ट्राच्या अब्रुची पुरती लक्तरं निघाली, प्रकाश जावडेकरांचं टीकास्त्र

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा