कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशासाठी विनाशकारी ठरत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊनसह कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य, दैनंदिन सुविधा आणि इतर आवश्यक गरजांसंंबंधीची माहिती मिळणं अत्यावश्यक झालं आहे. या माहितीची गरज लक्षात घेऊन मुंबई लाइव्ह सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मुंबई लाइव्ह प्रत्येक वॉर्डातील सर्व सेवांची माहिती देणारं पेज तयार करत आहे.
या प्रत्येक पेजवर आम्ही वॉर्डमधील महत्त्वाची माहिती, जसे दूरध्वनीवरून सल्ला देणारे डाॅक्टर, रुग्णालये / जम्बो कोविड सुविधा, 24x7 चालू असलेली आणि होम डिलिव्हरी देणारी औषधांची दुकानं, खाद्यान्न व किराणा मालांची दुकानं, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारांचा तपशील, आरटी-पीसीआर आणि रक्त तपासणी सुविधा आणि इतर बरीच माहिती उपलब्ध करून देत आहोत.
आम्ही या पेजवरील माहिती शक्य तितकी अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एखाद्या माहितीबद्दल काही शंका असल्यास आपणास विनंती आहे की, ती माहिती आपण पुन्हा तपासून घ्यावी.
तुर्भे हे नवी मुंबईचे एक उपनगर आहे. राज्यातील सर्वात मोठी बाजार समिती एपीएमसी मार्केट तुर्भेमध्येच आहे. तुर्भे ठाणे-बेलापूर रोड जवळ आहे. कोरोनाचा प्रसार जेव्हा होण्यास सुरुवात झाली तेव्हा नवी मुंबईतल्या तुर्भे भागात पहिला रुग्ण आढळून आला होता. एपीएमसी मार्केटमुळे येथे कोरोनाचा फैलाव अधिक होता. मात्र, त्यानंतर येथील कोरोना नियंत्रणात आला. येथे केलेल्या उपाययोजनांमुळे 'तुर्भे पॅटर्न' ओळखला जाऊ लागला.
इतर वाॅर्ड-नोडमधील लिंक्स-
तुर्भे मधील महत्त्वपूर्ण माहिती :
टेलि कन्सल्टिंग डाॅक्टर्स
8am to 12pm
12pm to 4pm
4pm to 8pm
8pm to 11pm
हॉटेल / खाद्य सेवा -
24x7 औषध दुकानं -
चाचणी प्रयोगशाळा
२४x७ मदत कक्ष, कोविड रुग्णालये खाटा, अॅम्ब्युलन्स-
किराणा स्टोअर्स
आॅक्सिजन मदत कक्ष-
022-27567254/ 022-27567009
स्मशानभूमी
कृपया लक्षात घ्या की, आपल्या प्रभागात सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा मदत मिळत नसेल तर आपल्या जवळच्या प्रभागाची माहिती पहा. ही माहिती मिळण्यासाठी संबंधित वॉर्डांच्या लिंकवर क्लिक करा.
संपूर्ण मुंबई लाइव्ह कुटुंबियांकडून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा!
टीपः वरील सर्व तपशील सार्वजनिकपणे उपलब्ध स्त्रोतांमधून मिळवलेले आहेत. आम्ही या तपशिलाची वैयक्तिरित्या पडताळणी केली आहे. मात्र, परिस्थितीनुसार यामधील माहिती बदलली जाऊ शकते. माहितीची सत्यता ही नागरिकांनी आपल्या विवेकबुद्धीने तपासून घ्यावी.