Advertisement

मुंबईतल्या ८ डॉक्टरांचा सीरमच्या कोविशिल्ड लसीला नकार

मुंबईस्थित डॉक्टरांनी सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला नकार दिला आहे.

मुंबईतल्या ८ डॉक्टरांचा सीरमच्या कोविशिल्ड लसीला नकार
SHARES

मुंबईस्थित डॉक्टरांनी सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला नकार दिला आहे. त्याऐवजी त्यांनी कोवॅक्सीन ही लस जे.जे. रुग्णालयात घेतली. वृत्तानुसार, आठ डॉक्टरांनी कोविशिल्ड नाकारलं आहे. यावर रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे.

लसीकरण कार्यक्रमावर नजर ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या को-विन अ‍ॅपवर नावं नोंदवली जात नाहीत, तोपर्यंत अधिकारी आता भारत बायोटेक-निर्मित लसीसाठी ऐच्छिकांना वॉक-इनची परवानगी देणार आहेत.  तथापि, हे त्यांच्यासाठी नाही ज्यांना कोवाक्सिन वाटप केलं गेलं आहे.

दरम्यान, शुक्रवारी, २२ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) कोविशिल्ट लस आंतरराष्ट्रीय ठिकाणी निर्यात करणारे देशातील पहिले विमानतळ ठरले. सूत्रांच्या माहितीनुसार, सीएसएमआयएनं ब्राझील आणि मोरोक्कोला या लसीची आंतरराष्ट्रीय शिपमेंट सुरू केली आहे.

दुसरीकडे, १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण ९ हजार १०५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात लस घेतली आहे. शनिवारी २ हजार ३६६ आरोग्य कर्मचारी किंवा १०२.८७ टक्के ठाणे इथल्या २ केंद्रांवर लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांनी दिली. याशिवाय, मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत ९ हजार १०० आरोग्य कर्मचारी किंवा ७९.१७ टक्के नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.



हेही वाचा

मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ५२३ दिवसांवर

मुंबईला मिळाले कोव्हिशिल्ड लसीचे आणखी सव्वा लाख डोस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा