Advertisement

अंबरनाथमध्ये लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यमुळे स्थानिक पालिका प्रशासनांनी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे.

अंबरनाथमध्ये लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय
SHARES

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  त्यमुळे स्थानिक पालिका प्रशासनांनी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. त्यानुसार आता अंबरनाथ शहरात लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. 

अंबरनाथमध्ये पूर्व भागात असलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रात २५० खाटांचं लहान मुलांचं कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय अंबरनाथ नगरपालिकेने घेतला आहे. याची तयारीही नगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. रुग्णालयाच्या उभारणीसाठी लागणारी यंत्रण खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. महिनाभरात हे रुग्णालय उभारण्याचा नगरपालिकेचा मानस आहे.

या केंद्रात  नवजात बालकापासून १६ वर्षांपर्यंतच्या मुलांना ठेवलं जाणार आहे. तसंच नवजात ते वय वर्षे ५ आणि ६ ते १६ असे दोन गट केले जाणार आहेत. वय वर्षे ६ ते १६ या गटातील सर्वाधिक मुलांचा भरणा असण्याची शक्यता असल्याने सर्वाधिक खाटा या मुलांना समोर ठेवून सुरू केल्या जाणार आहेत. 

या रुग्णालयात ५० खाटा या अतिदक्षता विभागासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यातील ४० खाटा वय वर्षे ६ ते १६ या गटासाठी तर १० खाटा या नवजात ते वय वर्षे ५ च्या गटातील मुलांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने या 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा