Advertisement

लवकरच १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात

लवकरच १२ ते १४ या वयोगटातील मुलांना देखील कोरोनाची लस दिली जाणार आहे.

लवकरच १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात
SHARES

आता १२ ते १४ या वयोगटातील मुलांना देखील कोरोनाची लस दिली जाणार आहे. मार्च महिन्यात या मुलांना लस देण्याचा विचार सरकार करत आहे. ३ जानेवारीपासून १५ ते १७ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.

नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनाइझेशन (NTAGI) चे चीफ डॉ एन के अरोड़ा यांनी सांगितलं की, देशात १५ ते १७ या वयोगटातील सुमारे ३.३१ कोटी मुलांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, केवळ १३ दिवसाता ४५ टक्के मुलांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. १५ ते १७ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला ३ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर सध्या देशभरात मुलांचे लसीकरण सुरू आहे.

जानेवारीच्या शेवटपर्यंत १५ ते १७ या वयोगटातील सुमारे ७.४ कोटी मुलांना लसीचा पहिला दिला जाईल. त्यानंतर मुलांना फेब्रुवारीमध्ये दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत दोन्ही डोस मुलांना दिले जातील. त्यानंतरच १२ ते १४ या वयोगटातील मुलांनी फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चमध्ये कोरोनाची लस देण्यात सूरुवात होऊ शकते.

१२ ते १७ या वयोगटातील मुले देखील मोठ्या प्रमाणात वयस्कर प्रमाणेच असतात. त्यामुळे सरकार या मुलांना लसीकरणासाठी प्राधान्य देत आहे. कारण किशोरवयीन मुले शाळेत किंवा कॉलेजमध्ये किंवा अन्य ठिकाणी फिरतात. त्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे या मुलांना लवकरात-लवकर लस देणे खूप आवश्यक आहे.

इंडियन अॅकादमी ऑफ पीडियाट्रिक्सचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांचे म्हणणे आहे की, ५ ते १४ या वयोगटातील ज्या मुलांना गंभीर आजार आहेत. त्यांना देखील लवकरात-लवकर लसीकरण करून घेण्याचे सरकारचे नियोजन आहे.

भारत बायोटेकनं तयार केलेल्या को-वॅक्सीनला भारत सरकारनं २ ते १७ या वयोगटातील मुलांना आपातकालीन वापरास मंजुरी दिली आहे. चाचणीमध्ये को-वॅक्सीन सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे.

देशात आतापर्यंत १५७ कोटींपेक्षा जास्त जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. गेल्या २४ तासात ३९ लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोना प्रतिबंध लस घेतली आहे. लस सुमारे ७६ टक्के जणांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.



हेही वाचा

'त्या' प्रवाशांना सक्तीचे गृहविलगीकरण आणि आरटीपीसीआर चाचणीतून सूट

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बूस्टर डोस घेण्यात मुंबई आघाडीवर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा