• नोटांचा गोंधळ, रुग्णांचे हाल
SHARE

परळ - परळचं टाटा हॉस्पिटल. हॉस्पिटलबाहेर बसलेले हे रुग्ण, त्यांचे नातेवाईक पुरते हवालदील झालेत. देशभरातून रुग्ण इथे उपचारांसाठी येतात. जीव वाचवण्याच्या धडपडीतून इथे येणाऱ्या यातल्या अनेकांच्या डोक्यावर ना छत असतं, ना खाण्या-पिण्यापुरतेही पैसे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करून मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतलाय खरा, पण याचा नाहक त्रास या कर्करुग्णांना आणि त्यांच्या नातलगांना होतोय. आज औषधं घ्यायची म्हटली, तर कुणी 500, 1000 रुपयांच्या नोटा घेत नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. प्रत्येक रुग्णालयात हिच परिस्थिती. 

सरकारचा निर्णय भले देशाच्या फायद्यासाठी असेल. पण त्यात भरडला जातोय तो सर्वसामान्य माणूस. हा तोच माणूस आहे, ज्याच्या भल्यासाठी काळा पैसा रोखणाऱ्या नोटा बंद करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागलाय.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या