Advertisement

मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा दर घटला

मुंबईत रोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर एक दिलासा देणारी बातमी आहे.

मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा दर घटला
SHARES

मुंबईत रोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर एक दिलासा देणारी बातमी आहे. या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या रोजच्या वाढीत दीड टक्क्यांनी घट झाली आहे. मागील आठवड्यात मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर ६.६१ टक्के होता. या आठवड्यात तो रुग्णवाढीचा सरासरी दर घटून ५.१७ टक्के इतका झाला आहे.

मुंबईत वरळी, प्रभादेवी, लोअर परळ या ठिकाणी कोरोनाचा जास्त प्रार्दुभाव आहे. महापालिकेच्या दादर जी-उत्तर, भायखळा ई विभाग, माटुंगा एफ-उत्तर, अंधेरी के-पश्चिम सांताक्रुज एच-पूर्व व कुर्ला एल विभाग या सहा विभागांत दोन हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पालिकेच्या नऊ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील कोरोना रुग्णांनी एक हजाराचा आकडा ओलांडला आहे.

पश्चिम उपनगरातील दहिसर आर-उत्तर विभागात सर्वात कमी रुग्ण आढळले असून, या भागात ३०९ रुग्णांची नोंद झाली आहे. फोर्ट ए विभाग व डोंगरी बी विभाग पालिकेच्या अन्य विभागापेक्षा लहान असतानाही येथे अनुक्रमे ८८२ व ४३५ रुग्ण सापडले आहेत.

विभागनिहाय रुग्णसंख्या

जी उत्तर दादर - २७२८

ई विभाग भायखळा - २४३८

एफ उत्तर माटुंगा - २३७७

कुर्ला एल विभाग - २३२१

एच पूर्व सांताक्रुज - २०९४

अंधेरी पश्चिम के पश्चिम - २०४८

जी दक्षिण प्रभादेवी - १९०५

अंधेरी पूर्व के पूर्व - १८७५

गोंवडी एम पूर्व विभाग - १६९६

एफ दक्षिण परळ - १६४८

घाटकोपर एन विभाग - १५२५

भांडुप एस विभाग - १२७८

चेंबूर एम पश्चिम विभाग - ११६५

डी विभाग ग्रँड रोड - १०७५

मालाड पी उत्तर विभाग - १०४९

गोरेगाव पी दक्षिण विभाग - ८८८

ए - विभाग फोर्ट - ८८२

एच पश्चिम वांद्रे - ८२३

कांदिवली आर दक्षिण - ७६७

बोरिवली आर मध्य - ६७९

मुलुंड टी विभाग - ६२६

बी - विभाग पायधुनी - ४३५

सी विभाग चंदनवाडी - ३८०

दहिसर आर उत्तर - ३०९



हेही वाचा -

राज्यात मान्सून ८ जूनपर्यंत दाखल होणार

कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात १५० खाटांचं कोरोना रुग्णालय




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा