मुंबईला डेंग्यूचा विळखा

सायन - रूग्णालयांमध्ये उडालेली ही झुंबड. जिथे बघाल तिथे डेंग्यूचे पेशंट. कुणी बेडवर झोपलंय तर कुणी चटईवर. अगदी एका बेडवर दोन-दोन पेशंट तुम्हाला दिसतील. 50 बेड असलेल्या वॉर्डमध्ये 100 पेशंट ठेवले जातायेत. सध्या सर्वच पालिका रूग्णालयात हेच चित्र. एक पेशंट उपचार घेऊन बरा होतो तोपर्यंत दुसरा पेशंट त्याची जागा भरतो. सरकारी रूग्णालयांमध्ये हाऊसफुल्लचा बोर्ड लागल्याने डेंग्यू पेशंटना खासगी रूग्णालयांमध्ये धाव घ्यावी लागतेय. पण खासगी रूग्णालयांमधील खर्च सामन्य नागरिकांना परवडत नाहिये.

दरवर्षी आरोग्य विभागाकडून साथीच्या आजारांसाठी विशेष सोय केल्याचे सांगण्यात येते. मात्र डेंग्यूचे वाढते पेशंट पाहता पालिका आणि रूग्णायातील व्यवस्था अपुरी पडतेय.

 

Loading Comments