Advertisement

मुलांचे दात वाचवा


मुलांचे दात वाचवा
SHARES

दातांचा त्रास होणं हे काय नवीन नाही. दात पडणं, किडणं, किडल्यामुळे दुखणं, असा त्रास फक्त लहान मुलानांच नाही, तर तरुण-तरुणींपासून ५० वर्षांच्या व्यक्तीलाही होतो. लहान मुलांना दात दुखण्याचा त्रास सहन होत नसेल, तर कमी वयातच त्यांचा दात काढला जातो. पण दात काढल्यानंतर तेथील मोकळ्या जागेतून येणारा दात वेडावाकडा येण्याची शक्यता असते. खासकरून पडलेल्या दाताच्या जागी लहान मुलांनी सारखी जीभ लावल्यावर तेथील दात वेडावाकडा येताे, असं म्हणतात. पण, यात किती तथ्य आहे, हे अजूनही सिद्ध झालेलं नाही. खरंतर दातांची योग्य निगा राखली, तर दात आपली आयुष्यभर साथ देऊ शकतात. त्यामुळे दात काढून टाकण्याची वेळच येऊ नये म्हणून पुढील काळजी घ्यावी. 


लहान मुलांचे दात किडू नये म्हणून काय कराल ?

  • बाळ १ वर्षांचं झाल्यावर दंतचिकित्सकाकडे जाऊन मार्गदर्शन घ्या
  • बाळ जन्मल्यानंतर ६ महिन्यांपासून बाळाला दात देतात.
  • बाळाला सर्वप्रथम खालचे २ दात येतात. 
  • बाळ २ वर्षांचे होईपर्यंत त्याला हळूहळू २० दात येतात
  • ० - ३ वयोगटातील मुलांनी फक्त ब्रश आणि पाण्याने दात घासावे 
  • ३ - ६ वयोगटातील मुलांसाठी फ्लोराईडच्या वेगळ्या टूथपेस्ट असतात
  • डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या वाचाव्या
  • दात किडू नये म्हणून डॉक्टर्स काही 'जेल'ही सुचवतात




दात किडल्यानंतर काय कराल ?

लहान मुलांच्या पक्क्या खोलगट दातांना अनेकदा किड लागते. अशावेळेस हा दात काढायचा नसेल तर त्यात सीलंट नावाचं सिमेंट भरलं जातं. तसंच त्यांचं रुट कॅनल करायचं झाल्यास त्या दाताच्या नसेच्या जागी अॅंटिबॉयोटिक औषध लावलं जातं. मोठ्यांचं जेव्हा रुट कॅनल केलं जातं, तेव्हा त्यांची दुखणारी नस कापून त्या जागी आर्टिफिशिअल नस बसवली जाते.

लहान मुलांना कुठल्याही प्रकारचा माऊथ वॉश दिला जात नाही. कारण काय गिळावं आणि काय गिळू नये, हे त्यांना बऱ्याचदा कळत नाही.


माझ्याकडे दररोज २० ते २५ लहान मुलांचे पालक दात किडण्याची समस्या घेऊन येतात. या पालकांना आम्ही वेळोवेळी दातांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन करतो. आम्ही अनेकदा बाळाला दूध पाजणं टाळायला सांगतो. कारण त्यात मोठ्या प्रमाणात साखर असते. दूधाऐवजी जेवणातून पनीर किंवा चीज खायला द्यावं. ज्यातून त्यांना उत्तम प्रोटिन्स मिळतात. शिवाय, माता बाळाला स्तनपान करत असेल तर स्तनपानानंतर बाळाचे दात स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. जेणेकरुन दातांवर प्लार्क साचायची भीती राहत नाही. 

- लरेश मेस्त्री, बाल दंतचिकित्सक


रूग्णालयात दररोज ५० ते ६० हून अधिक लहान मुलं दातांच्या समस्यांसाठी येतात. पण, खरंतर दात वाचवण्यासाठी आईने सुरुवातीपासूनच काळजी घेतली पाहिजे. कारण, दूधाचे दात किडल्यानंतर एकतर फिलींग करावं लागतं किंवा त्यावर रुट कॅनल करावं लागतं. शेवटी जर ती किड नसेला त्रास देत असेल तर तो दात काढावा लागतो. त्यातही आम्ही जो पक्का दात येणार आहे, त्यासाठी स्पेस मेनंटर लावून ठेवतो. म्हणजे येणारा पक्का दात वाकडातिकडा येत नाही. 


डॉ. डिंपल पाडावे, बाल दंतचिकित्सक , शासकीय दंत महाविद्यालय


गर्भवती महिलेने चांगलं खायला पाहिजे. तिने सेवन केलेल्या पाण्यातून जर जास्त प्रमाणात फ्लोराईड शरीरात गेलं तर त्यातून जन्माला येणाऱ्या बाळाच्या दातांना फ्लोरोसीस नावाचा आजार होऊ शकतो. त्यामुळे मुलांचे दात वाचवण्यासाठी सर्वात प्रथम त्यांच्या आईवडिलांनी काळजी घ्यायला हवी.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा