शताब्दी रुग्णालयाच्या सुरक्षेचे तीन तेरा


  • शताब्दी रुग्णालयाच्या सुरक्षेचे तीन तेरा
  • शताब्दी रुग्णालयाच्या सुरक्षेचे तीन तेरा
  • शताब्दी रुग्णालयाच्या सुरक्षेचे तीन तेरा
  • शताब्दी रुग्णालयाच्या सुरक्षेचे तीन तेरा
SHARE

कांदीवली - एस.व्ही.रोड येथील शताब्दी रुग्णालयाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे पहायला मिळत आहे. अपघात विभागाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले डोर फ्रेम डिटेक्टर मशीन चक्क एक महिन्यापासून बिघडलं आहे. त्यामुळे रूग्णालय प्रशासनाने हे मशीन एका कोपऱ्यात ठेऊन दिले आहे.

रुग्णालयाच्या बाजूलाच पोलीस स्टेशन असल्याने येथे विविध प्रकारचे गुन्हेगार येतात. काही दिवसांपूर्वीच इथे उपचार घेत असणाऱ्या एका रुग्णावर प्राणघातक हल्ला झाल्याचेही समोर आले होते. त्यामुळे रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची योग्य ती तपासणी होणं आवश्यक आहे. मात्र हे डिटेक्टर मशीन बंद पडल्यामुळे रूग्णांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा राम भरोसेच असल्याचं चित्र या ठिकाणी पहायला मिळत आहे.

दरम्यान, याविषयी रुग्णालयाचे डीन कृष्णकुमार पिंपळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी डिटेक्टर लवकरात लवकर सुरु करण्याचे आश्वासन दिले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या