Advertisement

बीकेसी जम्बो कोविड सेंटरमधील डॉक्टरांवर मनसेचा गंभीर आरोप, जाब विचारण्यासाठी सेंटरवर धाड

बीकेसी कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा आणि अनुभव नसणारे कर्मचारी आहेत असा आरोप मनसेने केला.

बीकेसी जम्बो कोविड सेंटरमधील डॉक्टरांवर मनसेचा गंभीर आरोप, जाब विचारण्यासाठी सेंटरवर धाड
SHARES

मुंबई महानगरपालिके(BMC)नं बीकेसी इथल्या जम्बो कोविड सेंटर(Jumbo Covid Center) मध्ये नियुक्त केलेले डॉक्टर हे दुसऱ्या रूग्णालयात नोकरी करत असल्याचा आरोप मनसे(MNS)नं केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं बीकेसी कोविड सेंटरचे डीन राजेश ढेरे यांची भेट घेतली आणि अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केले.

मुंबई(Mumbai)त कोरोना रूग्णांची (Corona Patient) सतत वाढणारी संख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेनं बीकेसी (BKC) इथं जम्बो कोविड सेंटर उभारलं. या कोविड सेंटरची जबाबदारी ही डॉ. राजेश डेरे यांच्याकडे देण्यात आली आहे.


बीकेसी कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा आणि अनुभव नसणारे कर्मचारी आहेत असा आरोप मनसेने केला होता. या आरोपानंतर ढेरे यांच्याकडून आठवडाभरात स्पष्टीकरण मागवलं होतं, ते न आल्यानं बुधवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बीकेसी कोविड सेंटरवर जावून कंत्राटदाराला जाब विचारला.

या ठिकाणी नेमण्यात आलेले अनेक डॉक्टर इतर ठिकाणी काम करतात असा आरोप सातत्यानं होत आहे. मात्र त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील मनसेच्या शिष्टमंडळानं केली आहे.

दरम्यान, मुंबईत (mumbai) मंगळवारी ८३१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ५८६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत ९५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईत   १७३२८ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४५३ दिवसांवर गेला आहे. 

राज्यात कोरोनाची कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५७ लाख ६१ हजार ०१५ झाली आहे. यामधील ५४ लाख ३१ हजार ३१९ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.२८ टक्के ढे झाले आहे. मृत रुग्णांची संख्या ९६ हजार १९८ इतकी झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.६७ टक्के आहे. 

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५२,७७,६५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,६१,०१५ (१६.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,६८,११९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ९,३१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.



हेही वाचा

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबाबत मनसेनं राज्य सरकारला सुचवला पर्याय

म्हणून तुम्हाला आरोग्यसेवक मिळत नाहीत, मनसेने मुख्यमंत्र्यांना सुनावलं

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा