Advertisement

म्हणून तुम्हाला आरोग्यसेवक मिळत नाहीत, मनसेने मुख्यमंत्र्यांना सुनावलं

लोकांच्या मनातली तुमच्याबद्दलची विश्वासार्हता कमी झाली आहे, म्हणून तुम्हाला डॉक्टर, आरोग्यसेवक मिळत नाहीत.

म्हणून तुम्हाला आरोग्यसेवक मिळत नाहीत, मनसेने मुख्यमंत्र्यांना सुनावलं
SHARES

रस्त्यावर उतरून लाॅकडाऊनच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोविड योद्ध्यांची, जनतेची मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा असा टोला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला होता. परंतु लोकांच्या मनातली तुमच्याबद्दलची विश्वासार्हता कमी झाली आहे, म्हणून तुम्हाला डॉक्टर, आरोग्यसेवक मिळत नाहीत, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.

तुमचं ऐकलं आता आमचं ऐका, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. कोरोनाकाळात अनेक आरोग्यसेवक स्वत:हून सरकारला मदत करण्यासाठी आले होते. पण करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच सरकारने त्या लोकांना कामावरून काढून टाकलं. त्यामुळे पुन्हा ते कामावर आले, तर सरकार त्यांना काढून टाकणार नाही, याची काय खात्री आहे? असा प्रश्न यावेळी देशपांडे यांनी उपस्थित केला.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शुक्रवार २ एप्रिल रोजी राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी लाॅकडाऊन आणि कडक निर्बंधावरून सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केलं. 

हेही वाचा- तर कडक निर्बंध लावावेच लागतील, मुख्यमंत्र्यांनी दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

कडक निर्बंधांवरून सध्या अनेकजण सल्ले देत आहेत, निवेदने पाठवली जात आहेत. सर्वसामान्यांना त्रास होईल, अशी लॉकडाऊनची भूमिका आम्ही खपवून घेणार नाही. त्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरु, तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम नाही. कोरोनाच्या संसर्गाला लॉकडाऊन अंतिम पर्याय नाही. हिटरलसारखे वागू नका. लॉकडाऊन लावायचा तर रोजगाराचे पैसे थेट खात्यात जमा करा. 

एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊनऐवजी आरोग्यव्यवस्था वाढवा. आपण आरोग्य सुविधाही वाढवतच आहोत. बेड, औषधं, व्हेंटिलेटर्स वाढवता येतील, पण डाॅक्टर, नर्स, आरोग्य यंत्रणा सांभाळणारे तज्ज्ञ कसे वाढवता येतील? कृपा करून रोज मला किमान ५० डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांची महाराष्ट्रात पुरवठा होईल, अशी काहीतरी सोय करा. कारण फर्निचरचं दुकान म्हणजे हाॅस्पिटल नसतं, अशां शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना उत्तर दिलं होतं.

तर, अनेकांना असं वाटतं की मास्क का लावायचा? मी मास्क वापरत नाही असं काही लोक इतरांना सांगतात. पण मास्क न वापरण्यात शौर्य कसलं? मास्क वापरत नाहीस म्हणजे तू कोणी शूर आहेस का? मास्क लावण्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? लसीकरण घेतल्यानंतरसुद्धा मास्क लावलाच पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंनाही (raj thackeray) टोला लगावला होता.

(mns leader sandeep deshpande criticized cm uddhav thackeray over lockdown)

हेही वाचा- होम क्वारंटाईनसाठी बीएमसीची नवी नियमावली

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा