Advertisement

होम क्वारंटाईनसाठी बीएमसीची नवी नियमावली

होम क्वारंटाईन असलेल्या कोरोना रुग्णांमुळे कुटुंबातील अन्य सदस्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे होम क्वारंटाईनसाठी मुंबई महापालिकेने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

होम क्वारंटाईनसाठी बीएमसीची नवी नियमावली
SHARES

होम क्वारंटाईन असलेल्या कोरोना रुग्णांमुळे कुटुंबातील अन्य सदस्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे होम क्वारंटाईनसाठी मुंबई महापालिकेने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

या नियमावलीनुसार, होम क्वारंटाईनमध्ये राहू इच्छिणाऱ्या रुग्णाच्या घरी विलगीकरणाची व्यवस्था आहे की नाही याची पडताळणी करण्यात येणार आहे. तसंच दर दिवशी गृहविलगीकरणातील किमान १० टक्के रुग्णांच्या घरी जाऊन विचारपूस केली जाणार आहे. तसे निर्देश पालिका प्रशासनाने वैद्यकीय पथकांना दिले आहेत. 

मुंबईत लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांना घरी विलगीकरण करून औषधोपचार दिले जातात. होम क्वारंटाईनमधील रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसंच वैद्यकीय मंडळी आणि नियंत्रण कक्ष यांच्यासाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने केलेल्या विविध सूचना समाविष्ट असलेले सुधारित परिपत्रक जाहीर केलं आहे.

होम क्वारंटाईन कोणाला?

- कोरोना चाचणी केल्यानंतर पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन करता येऊ शकते.

- लक्षणे नसलेले बाधित

- सौम्य लक्षणे असलेले (म्हणजे ज्यांना सहव्याधी नाहीत, ताप १०० फॅरनहाईटपेक्षा कमी आहे, ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा अधिक)

- प्रौढ व सहव्याधी असलेले रुग्ण ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाहीत अशा रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्षणे नसलेले बाधित किंवा सौम्य लक्षणे असलेले बाधित म्हणून निर्देशित करणे आवश्यक असेल.

- प्रसूतिकाळ दोन आठवड्यांवर असलेल्या गर्भवती महिलांना होम क्वारंटाईन करता येणार नाही. तर स्तनदा मातांच्या बाबतीत वैद्यकीय तज्ज्ञ व नियमित कौटुंबिक चिकित्सक यांच्या विचारविनिमयानुसार योग्य निर्णय घेतला जाणार.

… तरच होम क्वारंटाईन

- रुग्णांच्या घरी स्वत:ला वेगळे करून घेण्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसाठीही क्वारंटाईनच्या पुरेशा सुविधा असाव्यात.

- रुग्णासाठी खेळती हवा असलेली खोली व स्वतंत्र प्रसाधनगृह असावे.

- रुग्णाने कुटुंबातील इतर सदस्यांपासून विशेषत: सहव्याधी असलेली ज्येष्ठ मंडळी यांच्यापासून स्वत:ला दूर ठेवावे.

- होम क्वारंटाईन  रुग्णाबाबत नातेवाईक, शेजारी, गृहनिर्माण पदाधिकारी, नियमित कौटुंबिक चिकित्सक यांना माहिती असणं आवश्यक .



हेही वाचा -

कोरोनामुळं मुंबईतील ६०० हून अधिक इमारती सील

मुंबईत शुक्रवारी ८ हजार ८३२ नवीन रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा