Advertisement

मुंबईत शुक्रवारी ८ हजार ८३२ नवीन रुग्ण

शुक्रवारी ५ हजार ३५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २० मृतांची नोंद झाली आहे.

मुंबईत शुक्रवारी ८ हजार ८३२ नवीन रुग्ण
SHARES

मुंबईत सलग दुसऱ्या ८ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी ८ हजार ८३२ नवीन रुग्णांची नोेंद झाली आहे. मुंबईतील ही आजची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. 

रोज वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक बनली आहे. त्यामुळे मुंबईत अधिक कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी ५ हजार ३५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २० मृतांची नोंद झाली आहे. 

नव्या रुग्णसंख्येमुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ३२ हजार १९२ झाली आहे. तर, आतापर्यंत एकूण ३ लाख ६१ हजार ४३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर, ११ हजार ७२४ रुग्णांच्या मृतांची नोंद आहे. सध्या मुंबईत ५८ हजार ४५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.



हेही वाचा -

मुंबईत मार्चमध्ये कोरोना रुग्ण संख्येत ४७५ टक्के वाढ

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, गुरूवारी तब्बल 'इतके' नवे रुग्ण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा