Advertisement

कोरोनामुळं मुंबईतील ६०० हून अधिक इमारती सील

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्य सरकारनं कोरोनाची दुसरी लाट आल्याचं जाहीर केलं.

कोरोनामुळं मुंबईतील ६०० हून अधिक इमारती सील
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्य सरकारनं कोरोनाची दुसरी लाट आल्याचं जाहीर केलं. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळं महापालिका प्रशासनानं कोरोनाला आळा घालण्यासाठी कबर कसली आहे. अशातच या कोरोनामुळं मुंबईत सध्या ६०० हून अधिक इमारती सील करण्यात आल्या आहेत.

मुंबई महानगर पालिकेच्या नियमांनुसार ज्या इमारतींमध्ये पाच आणि पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारती सील केल्या जात आहेत. त्यानुसार मुंबईत सध्या ६०० हून अधिक इमारती सील करण्यात आल्या आहेत.

शिवाय, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री जनतेशी संवाद साधताना लॉकडाऊनबाबत माहिती दिली. राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन पुढील २ दिवसांत लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच, कडक निर्बंध ही लागू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा