Advertisement

लॅपटॉप तोंडावर फुटला; २५ शस्त्रक्रियेनंतर वाचला जीव

आपल्या आरोग्याची पर्वा न करता आपलं काम लवकरात लवकर कसं संपेल असं प्रत्येकाला वाटत असतं. पण घाईगडबडीत केलेलं कोणतंही काम जीवावर बेतू शकतं, याची जाणीव प्रत्येकानेच ठेवायला हवी. ताडदेवच्या भाटीया रुग्णालयात दाखल असलेल्या चाळीस वर्षीय निशांत केडीया यांना हीच चूक नडली. ज्यामुळे त्यांचा जीव जाता जाता वाचला.

लॅपटॉप तोंडावर फुटला; २५ शस्त्रक्रियेनंतर वाचला जीव
SHARES

डिजिटल युगात सर्वचजण कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर तासनं तास काम करत असतात. आपल्या आरोग्याची पर्वा न करता आपलं काम लवकरात लवकर कसं संपेल असं प्रत्येकाला वाटत असतं. पण घाईगडबडीत केलेलं कोणतंही काम जीवावर बेतू शकतं, याची जाणीव प्रत्येकानेच ठेवायला हवी. ताडदेवच्या भाटीया रुग्णालयात दाखल असलेल्या चाळीस वर्षीय निशांत केडीया यांना हीच चूक नडली. ज्यामुळे त्यांचा जीव जाता जाता वाचला.


काय झालं निशांतसोबत?

मूळचे झारखंडच्या रांची इथं राहणारे निशांत केडीया हे गृहस्थ ५ महिन्यांपूर्वी नेहमीप्रमाणे लॅपटॉपवर आपलं काम करत होते. काम झाल्यावर लॅपटॉपची 'बॅटरी लो' झाल्यामुळे त्यांनी आपला लॅपटॉप चार्जिंगला लावला आणि ते झोपून गेले. पण हा दुर्लक्षितपणा त्यांच्या चांगलाच अंगलट आला. कारण लॅपटाॅपचं चार्जिंग ओव्हरलोड झाल्यामुळे लॅपटॉपचा अक्षरश: स्फोट झाला. हा भडका इतका जबरदस्त होता की त्यात निशांतचा चेहरा जळला.



आगीत होरपळला

स्फोटाच्या आवाजामुळे घरतले व्यक्ती खडबडून जागे झाले आणि त्यांनी बेडरूममध्ये धाव घेतली. आगीच्या ज्वाळांमुळे दरवाजा घट्ट बसला होता. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा खोलून आग विझवण्यात आली. या स्फोटाचा फटका इतका जबर होता की त्यात निशांतचा संपूर्ण चेहरा, हात आणि खांदा जळाला. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय त्यांना त्वरीत एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेले, पण त्याची ही अवस्था बघून रुग्णालयाने त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला.


रुग्ण पूर्वपदावर

यानंतर केडीया कुटुंबीयांनी थेट मुंबईत धाव घेतली. या स्फोटामुळे निशांतचं शरीर ५० टक्के भाजलं होतं. मुंबईतील भाटिया रुग्णालयात निशांतवर तब्बल २५ शस्त्रक्रिया झाल्या. निशांतला संपूर्ण बरं होण्यासाठी ५ महिन्यांचा अवधी लागला. अत्यंत गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यादरम्यान बरेच दिवस निशांत व्हेंटिलेटर होते. ते आता बरे झाले असून ते त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत, असं भाटीया रुग्णालयाचे प्लास्टिक सर्जन आणि बर्न इन्चार्ज डॉ. शैलेश रानडे म्हणाले.



हेही वाचा-

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त 31 मे रोजी जनजागृती अभियान

मासिक पाळीबद्दल लोकांचा सकारात्मक दृष्टिकोन



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा