Advertisement

COVID-19 Vaccination: ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांनी लस घ्यावी की नाही?

कोविड -१९ लस महामारीशी लढण्यासाठी महत्त्वाची आहे. पण कर्करोगाच्या रूग्णांच्या मनात लसीबद्दल अनेक प्रश्न आहेत.

COVID-19 Vaccination: ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांनी लस घ्यावी की नाही?
SHARES

ऑक्टोबर हा स्तन कर्करोग जागरुकता महिना म्हणून पाळला जातो. यानिमित्त जाणून घेऊयात की, स्तनाचा कर्करोग असलेले रुग्ण लसीकरण करू शकतात की नाही.

कोविड लस ही एक जैविक फॉर्म्युलेशन आहे जी आपली प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी दिली जाते. कोरोनाव्हायरस संसर्ग टाळण्यासाठी किंवा रोगाचे गंभीर स्वरूप टाळण्यासाठी ही लस दिली जातेय. लस आता एक वर्षाहून अधिक काळ वापरल्या जात आहेत आणि खूप सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं आहे.

कोविड -१९ लस महामारीशी लढण्यासाठी महत्त्वाची आहे. पण कर्करोगाच्या रूग्णांच्या मनात लसीबद्दल अनेक प्रश्न आहेत. कर्करोगाच्या रुग्णांसाठी लस किती परिणामकारक आहे याचीच माहिती आम्ही देणार आहोत. आमच्या या माहितीमुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी आशा करतो.

१) कोविड संसर्गातून बरे झाल्यानंतर मला नुकतेच स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. मी डोस घेऊ शकते का?

सामान्य लोकसंख्येप्रमाणे, COVID मधून नुकतेच बरे झालेल्या रुग्णांनी ३ महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी.

२) मी नव्यानं निदान झालेला स्तनाचा कर्करोग रुग्ण आहे. मी लस घेऊ शकतो का?

होय, कर्करोगाचा उपचार सुरू होण्यापूर्वीच, रुग्ण लस घेऊ शकतात.

३) शस्त्रक्रिया करायची असताना स्तनाचा कर्करोग असलेला रुग्ण लस घेऊ शकतात का?

शस्त्रक्रियेच्या नियोजित तारखेच्या ५-७ दिवस आधी तुमच्या लसीचा डोस घेऊ शकता. कारण तुम्हाला काही सौम्य दुष्परिणाम होऊ शकतात जे त्रासदायक असू शकतात.

जर शस्त्रक्रियेची तत्काळ योजना केली गेली असेल, तर शस्त्रक्रियेनंतर काही आठवड्यांनी तुम्ही लस घ्या जेव्हा तुम्ही प्रक्रियेमधून पूर्णपणे बरे व्हाल.

४) स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण केमोथेरपी आणि रेडिओथेरपीवर असतील तर?

रेडिओथेरपीवरील रुग्णांना कोणत्याही अडथळ्याशिवाय उपचारादरम्यान कधीही डोस मिळू शकतो. केमोथेरपीचे रुग्ण पुढच्या केमोच्या दरम्यान डोस घेऊ शकतात.

५) हे खरे आहे की लस घेतल्यानं कर्करोगाचा प्रसार लिम्फ नोड्समध्ये होऊ शकतो?

नाही, असा कुठलाच पुरावा अद्याप समोर आला नाही. लसीकरणानंतर अॅक्सिलरी लिम्फ नोड्स विकसित करणाऱ्या रुग्णांची एक किंवा दोन उदाहरणे आहेत. पण या असंबंधित घटना होत्या. 

सर्व कर्करोगाचे रुग्ण सारखे नसतात. स्टेज 4 कर्करोगाच्या रूग्णांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या तुलनेत प्रतिकारशक्ती कमी असते. या रुग्णांनी त्यांच्या ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा आणि मार्गदर्शनाखाली लस घ्यावी.

कृपया तुम्हाला स्तनाचा कर्करोग आहे म्हणून COIVD-19 लस घेण्यास संकोच करू नका. सावध रहा, तुम्हाला काही शंका असल्यास ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला घ्या.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा