Advertisement

नवी मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७३५ वरून १३४ दिवसांवर

जानेवारी महिन्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना आटोक्यात होता. रुग्णांची संख्या सातत्याने घटत होती. त्यामुळे येथील रुग्णदुपटीचा कालावधी हा ७३५ दिवसांवर गेला होता

नवी मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७३५ वरून १३४ दिवसांवर
SHARES

नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रोज ४०० पेक्षा अधिक रुग्ण नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आढळत आहेत. आठवडाभरात शहरात २५०० नवीन करोना रुग्ण आढळले आहे. रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णदुपटीचा कालावधीही मोठा घटला आहे.  त्यामुळे पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे.

फेब्रुवारी महिन्यात शहरातील रुग्णदुपटीचा कालावधी दोन वर्षांपेक्षा अधिक म्हणजेच ७३५ दिवसांवर गेला होता. तो आता फक्त १३४ दिवसांवर म्हणजे ४ महिने महिन्यांवर आला आहे.  जानेवारी महिन्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना आटोक्यात होता.  रुग्णांची संख्या सातत्याने घटत होती. त्यामुळे येथील रुग्णदुपटीचा कालावधी हा ७३५ दिवसांवर गेला होता. मात्र १ फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णवाढ सुरू झाली आहे. 

मागील वर्षी कोरोना कहर सुरू असताना नवी मुंबईत सर्वाधिक रुग्ण हे साडेचारशेपेक्षा अधिक होते. हीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने बंद केलेली आरोग्य व्यवस्था आता पुन्हा सुरू करण्याची वेळ आली आहे. बुधवारपासून चारशे खाटांचे आरोग्य केंद्र सुरू करण्यात येत असून चार काळजी केंद्रे आठवडाभरात सुरू करण्यात येत आहेत.

रुग्णदुपटीचा कालावधी

१५ ऑगस्ट : ४५ दिवस

१५ सप्टेंबर : ६७ दिवस

१५ ऑक्टोबर : १११ दिवस

१५ नोव्हेंबर : ३५२ दिवस

१५ डिसेंबर : ४५४ दिवस

१५ जानेवारी : ६३४ दिवस

२ फेब्रुवारी : ७३५ दिवस

१६ फेब्रुवारी : ५८१ दिवस

२३ मार्च : १३४ दिवस 



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, बुधवारी ५ हजार नवे रुग्ण

मुंबईत यापुढे देशी झाडांचीच लागवड होणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा