Advertisement

नवी मुंबईत रूग्णदुपटीचा कालावधी तब्बल ३५७ दिवसांवर

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या १० दिवसात ११३६ पॉझिटिव्ह रूग्ण सापडलेले असून १३८४ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच २३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

नवी मुंबईत रूग्णदुपटीचा कालावधी तब्बल ३५७ दिवसांवर
SHARES

नवी मुंबईत डिसेंबरमध्ये कोरोना वाढीचा वेग नियंत्रित राहिला आहे. रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटत आहे. नवी मुंबईतील रूग्णदुपटीचा कालावधी तब्बल ३५७ दिवसांवर गेला आहे.  

नोव्हेंबर महिन्यात ७२,७७१ चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ३७३० व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. म्हणजेच केलेल्या चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) ५.१२ टक्के इतके होते.  १ डिसेंबरपासून १० डिसेंबरपर्यंत ३१,६४५  चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ११३६ कोरोनाबाधित आढळले आहेत. म्हणजेच कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) ३.५८ टक्के इतके कमी झालेले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० डिसेंबरपर्यंत एकूण ४९,३८७ कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून त्यापैकी ४७,०४६ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व १००७ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९५.२५ टक्के आणि मृत्यूदराचे प्रमाण  २.०३ टक्के आहे. 

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या १० दिवसात ११३६ पॉझिटिव्ह रूग्ण सापडलेले असून १३८४ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच २३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

कोरोना नियंत्रणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याला नागरिकांचीही साथ मिळत असून दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याचा धोका संभवत असताना कोरोना रूग्णसंख्येत मात्र तितकीशी  वाढ होत नसल्याचे काहीसे दिलासाजनक चित्र दिसून येत आहे.

मात्र नागरिकांनी गाफील न राहता मास्क, सुरक्षित अंतर व सतत हात धुणे या कोरोनापासून बचावाच्या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पालिकेकडून वारंवार करण्यात येत आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने दिवाळीच्या दिवसांतही कोरोना चाचण्यांमध्ये खंड पडू दिला नाही. उलट दिवाळीनंतर चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. २३ स्थायी चाचणी केंद्रामध्ये आता दोन अद्ययावत चाचणी वाहनांची भर टाकण्यात आलेली आहे. तसेच एपीएमसी मार्केट व एमआयडीसी क्षेत्राप्रमाणेच ५ रेल्वे स्टेशन्सवरही कोव्हीड चाचण्यांची विशेष केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. हेही वाचा  -

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी १ हजार झाडांवर कुऱ्हाड

ई-चलन न भरल्यास लायसन्स होणार रद्द, दंड न भरलेल्या २ हजार जणांचे परवाने होणार रद्दसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा