Advertisement

नवी मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ६१६ दिवसांवर

नवी मुंबईत दिवाळीनंतर कोरोना रुग्णांत वाढ झाली होती. त्यामुळे ३५२ दिवसांवर गेलेला रुग्णदुपटीचा कालावधी कमी होत २६५ दिवसांवर आला होता. मात्र, आता मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या पुन्हा कमी झाली आहे.

नवी मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ६१६ दिवसांवर
SHARES

नवी मुंबईतील कोरोना आता आटोक्यात आल्याचं दिसत आहे. रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे येथील रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ६१६ दिवसांवर गेला आहे.  

नवी मुंबईत दिवाळीनंतर कोरोना रुग्णांत वाढ झाली होती. त्यामुळे ३५२ दिवसांवर गेलेला रुग्णदुपटीचा कालावधी कमी होत २६५ दिवसांवर आला होता. मात्र, आता मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या पुन्हा कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णदुपटीचा कालावधी ६१६ दिवस म्हणजे एक वर्ष सहा महिन्यांपर्यंत गेला आहे.

नवी मुंबईत या आठवड्यात रोज रुग्णसंख्या ५० च्या जवळपास आहे.  त्यामुळे रुग्णदुपटीचा कालावधी हा दीड वर्षांपेक्षा अधिक दिवसावर गेला आहे. ही शहरासाठी दिलासादायक बातमी आहे. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे पाालिका प्रशासनाने सांगितले आहे.

नवी मुंबईत बुधवारी (३० डिसेंबर) कोरोनाचे नवीन ८४ रुग्ण सापडले आहेत. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५० हजार ९३५ झाली आहे. नवी मुंबईत नवीन रुग्ण कमी होत असताना बरे होणाचं प्रमाणही वाढत असल्याने कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. सद्या कोरोनाचे फक्त ९१३ रुग्ण आहेत.

त्यातील दोनशे रुग्ण हे वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात तर दोनशे रुग्ण नेरुळ येथील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचार घेत आहेत व शंभर रुग्ण हे खासगी रुग्णालयात असून निम्मे रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत. पालिकेने शहरातील सर्व विभागांत उभारलेली १२ काळजी केंद्र टप्प्याटप्प्याने बंद केली आहेत.



हेही वाचा -

जानेवारी ते नोव्हेंबर २०२० पर्यंत रेल्वेच्या हद्दीत ३५ हजार गुन्ह्यांची नोंद

सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शन क्षमतेत वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा