Advertisement

नवी मुंबईत जानेवारीत रूग्ण दुपटीचा कालावधी तब्बल २ वर्षांवर

जानेवारी महिन्यात १२ जानेवारी रोजी एकाही कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नसून त्यानंतरही १७,१८, २३, २५, २७, ३० जानेवारी अशा एकूण ७ दिवशी एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही व मृत्यूचे प्रमाणही कमी झालेले आहे.

नवी मुंबईत जानेवारीत रूग्ण दुपटीचा कालावधी तब्बल २ वर्षांवर
SHARES

डिसेंबर महिन्यात दोन आकड्यावर आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत जानेवारी महिन्यातही घट राहिली असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 

जानेवारी महिन्यात १२ जानेवारी रोजी एकाही कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नसून त्यानंतरही १७,१८, २३, २५, २७, ३० जानेवारी अशा एकूण ७ दिवशी एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही व मृत्यूचे प्रमाणही कमी झालेले आहे. त्याचप्रमाणे रूग्णदुपटीच्या कालावधीतही लक्षणीय वाढ झालेली असून ३० नोव्हेंबरपर्यंत  २६३  व ३१ डिसेंबरपर्यंत ६२४ दिवसांवर पोहचलेला रूग्णदुपटीचा कालावधी ३१ जानेवारीपर्यंत ७३० दिवस (दोन वर्षे) इतका झालेला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ॲक्टिव्ह रूग्णांची संख्याही आता कमी झालेली असून ३१ जानेवारी रोजी ८०२ (१.५१%) इतकेच कोरोना रूग्ण उपचार घेत ॲक्टिव्ह आहेत. ३१ डिसेंबरच्या तुलनेत (८९१ रूग्ण, १.७४ %) प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरी चाचण्यांची संख्या मात्र कमी करण्यात आलेली नसून रेल्वे स्टेशन्सवरही तपासणी केद्रे सुरू आहेत. जानेवारी महिन्यातही ५३७२३ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. या चाचण्यांमध्ये २००७ नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले असून  एकूण चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेट ३.७३ % इतका कमी आहे. कोरोना वाढीचा वेग कमी असला तरी जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला लसीकरण केले जात नाही तोपर्यंत सुरक्षेच्या त्रिसूत्रीचे पालन हीच बचावाची सर्वात सक्षम ढाल आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोनातून बरे होणा-या रूग्णांचे प्रमाण सतत वाढत असलेले दिसून येत असून जानेवारी  महिन्याच्या अखेरीस ५११२१ रूग्ण (९६.४३ %) बरे होऊन घरी परतले आहेत.



हेही वाचा -

मंगळवारी व बुधवारी माटुंगा परिसरात पाणीपुरवठा बंद

मुंबईतील 'इतकी' खासगी रुग्णालये धोकादायक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा