Advertisement

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १३२४ हजार दिवसांवर

मुंबईत सर्वाधिक रुग्ण दुपटीचा कालावधी बी प्रभाग म्हणजे सँडहर्स्ट रोडमध्ये ४७५६ दिवसांवर पोहोचला आहे

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १३२४ हजार दिवसांवर
SHARES

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात मुंबई महापपालिकेला यश आलं आहे.  दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल १३०० च्या वर गेला आहे. 

मुंबईत सर्वाधिक रुग्ण दुपटीचा कालावधी बी प्रभाग म्हणजे सँडहर्स्ट रोडमध्ये ४७५६ दिवसांवर पोहोचला आहे. तर सर्वात कमी रुग्ण दुपटीचा कालावधी ए प्रभाग कुलाबा-फोर्टमध्ये १०२५ दिवस आहे. मागील १५ दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या ५०० च्या खाली आहे. सद्या रोज ३०० ते ५०० पर्यंत रुग्ण आढळत आहेत.  

सोमवारी मागील पाच महिन्यात प्रथमच २९९ सर्वात कमी रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढून १३२४ दिवसांवर पोहचला आहे.२४ दिवसांपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी ७२० दिवसांवर होता.

सी प्रभाग मरीन लाइन्स २७५८ दिवस, एफ/दक्षिण परळ १९७६ दिवस, एन प्रभाग घाटकोपर १९०८ दिवस, पी/उत्तर मालाड १८३४ दिवस, पी/दक्षिण गोरेगाव १७७४ दिवस आणि ‘एल’ प्रभाग १६१९ दिवस असा रुग्ण दुपटीच्या कालावधी मुंबईत नोंदवला गेला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा