Advertisement

ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी २९९ दिवसांवर

ठाणे शहरात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याचं दिसत आहे. येथील रुग्ण दुपटीचा कालावधी २९९ दिवसांवर पोहचला आहे.

ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी २९९ दिवसांवर
SHARES

ठाणे शहरात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याचं दिसत आहे. येथील रुग्ण दुपटीचा कालावधी २९९ दिवसांवर पोहचला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९१ टक्के झाले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ५२,१५७ कोरोना रुग्ण आढळले. त्यापैकी ४९ हजार ५०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ११९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी मृत्यूचा दर २.३२ टक्के होता. तो आता कमी होऊन २.२८ टक्के झाला आहे. पालिका क्षेत्रात सध्या १४६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी ०.३० टक्के असलेला रुग्णवाढीचा साप्ताहिक वेग आता ०.२८ टक्क्य़ांवर आला आहे. 

दिवाळीपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. मात्र दिवाळीत बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत होती. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे  महापालिका प्रशासनाने खबरदारी घेऊन यंत्रणा सज्ज केली होती. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असल्याचं दिसत आहे.



हेही वाचा -

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, परिस्थितीही नियंत्रणात

कांदिवलीत बारवर कारवाई, आॅर्केस्ट्राच्या नावाखाली महिलांकडून अश्लील कृत्य



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा