Advertisement

महाराष्ट्रात तंबाखू आणि तंबाखुजन्य पदार्थांनतर ई-सिगरेटवर बंदी

इलेक्ट्रॉनिक सिगरेट म्हणजेच ई-सिगरेटवर देखील बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

महाराष्ट्रात तंबाखू आणि तंबाखुजन्य पदार्थांनतर ई-सिगरेटवर बंदी
SHARES

तंबाखू आणि तंबाखुजन्य पदार्थाचे व्यसन लागू नये, यासाठी राज्यभरात पान मसाला आणि गुटख्यावर राज्यभरात बंदी घालण्यात आली. त्यानंतर, आता इलेक्ट्रॉनिक सिगरेट म्हणजेच ई-सिगरेटवर देखील बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यामध्ये -सिगारेट, व्हॅप, -हुक्का यांसारख्यांचा समाविष्ट आहे. -सिगरेट हे तंबाखू सेवनाप्रमाणेच खतरनाक असल्याचं अन्न व औषध प्रशासनानं(एफडीए) म्हटलं आहे


राज्य सरकारकडं शिफारस

मागील वर्षी जुलै महिन्यात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सर्व राज्यांमध्ये ई-सिगरेटच्या विक्री, खरेदी आणि सेवनावर बंदी घालण्याचा सल्ला दिला होता. त्याशिवाय, एफडीएनं देखील यावर बंदी घालण्याची राज्य सरकारकडं शिफारस केली होती. -सिगरेटच्या सेवनामुळं आरोग्य समस्या होण्याची शक्यता असून, त्यामुळं कॅन्सर होण्याची देखील शक्यात मोठ्या प्रमाणात असते.


आरोग्यासाठी धोकादायक

-सिगरेटमध्ये टाकल्या जाणाऱ्या लिक्विडमध्ये लेड, क्रोमियम, निकेल यांसारखे धातू आणि आधी रासायनिक गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळं आरोग्यासाठी धोकादायक असतं. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यात ई-सिगरेटचं उत्पादन, वितरण आणि विक्रीवर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.



हेही वाचा -

मिठी नदीला पर्यटन स्थळ करण्यासाठी महापालिका करणार २१ कोटी खर्च

बेस्टचे १ हजार ३३३ कर्मचारी कर्गरोगाचे संशयित



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा