द्राक्ष आरोग्यास फायदेशीर

  Mumbai
  द्राक्ष आरोग्यास फायदेशीर
  मुंबई  -  

  हिरव्या आणि काळ्या रंगाची द्राक्षं बघितली की,  ती खाण्याचा मोह आवरत नाही. द्राक्षं शरीरासाठीही गुणकारीही आहेत. चवीला मधुर, रसाळ असणारी द्राक्षं शरीराला त्वरीत उर्जा देणारी आणि अनेक आजारांवर खूप फायदेशीर असतात.

  द्राक्षात प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, सोडियम, फायबर, व्हिटामिन ए, सी, ई, कॅल्शियम, लोह इत्यादी अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे द्राक्षं खाल्याने पोटाचे आजार कमी होतात. बद्धकोष्टता असेल तर त्यासाठी द्राक्ष हा उत्तम उपाय आहे. तसंच उलटी होत असल्यास द्राक्षावर काळी मिरी आणि मीठ टाकून खाल्यास उलटी थांबते.

  मायग्रेनच्या त्रासालाही द्राक्षं अतिशय उत्तम औषध आहे. डोकं दुखत असेल तर द्राक्षांचा रस प्यावा, त्याने लगेच आराम मिळतो. तसंच द्राक्षात मोठ्या प्रमाणात लोह असल्याने रक्तवाढीसही मदत होते. अंगदुखी, सांधेदुखीवर द्राक्षं औषधी उपाय आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.