Advertisement

Aarogya setu app: मुंबईत ‘आरोग्य सेतू’ अॅपच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश

मुंबई शहर जिल्ह्यात आरोग्यसेतू ॲपबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिले आहेत.

Aarogya setu app: मुंबईत ‘आरोग्य सेतू’ अॅपच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश
SHARES

मुंबई शहर जिल्ह्यात आरोग्यसेतू ॲपबाबत प्रभावी अंमलबजावणी करणं तसंच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत कार्ड वाटपाचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक सक्रिय व अधिक गतिमान होऊन (Effectively implement aarogya setu app in mumbai says collector ) हे दोन्ही कार्यक्रम राबवावे, असे निर्देश मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिले आहेत. या संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, महानगरपालिका तसंच खासगी रुग्णालयात आलेले रुग्ण, त्यांच्यासोबतचे नातेवाईक यांना आरोग्यसेतू ॲप संदर्भात सविस्तर माहिती देऊन त्यांना ते ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्याविषयी सांगावं. तसंच यासंदर्भात अधिकाधिक जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी निवतकर यांनी यावेळी दिल्या. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना इष्टांकपूर्तीसाठी जिल्हा समन्वयक यांनी ठोस कार्यक्रम सादर करुन तो राबवावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

हेही वाचा - आरोग्य सेतू अ‍ॅपची उंच भरारी, टॉप १० यादीत समावेश

या बैठकीला जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मानकेश्वर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रविण भावसार, डॉ. प्रतिभा जाधव, डॉ. प्रियांशी यादव, इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे डॉ. एस. एस. उत्तुरे, डॉ. पंकज बंदरकर, डॉ.अनिल पाचणेकर, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे डॉ. वैभव माने, एनआयसीच्या कविता पाटील आदींनी सहभाग घेतला.  

अ‍ॅप कसं काम करतं?

आरोग्य सेतू अ‍ॅप कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे. तुम्ही कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला आहात की नाही, हे आरोग्य सेतू अ‍ॅप लोकांना सांगतो. याशिवाय या अ‍ॅपद्वारे कोरोना इन्फेक्शनचा किती धोका आहे? हे देखील आपणास कळू शकतं.

आरोग्य सेतू अॅप हिंदी, इंग्रजी आणि मराठी यासह ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या पद्धतीही नमूद केल्या आहेत. या व्यतिरिक्त, आपल्या प्रवासाच्या हिस्ट्रीनंतर आणि मुळात राहत असलेल्या जागेवरून कोरोना संक्रमणाचा धोका आहे की नाही हे अॅप आपल्याला सांगतं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा