Advertisement

लसीकरणाची माहिती एका क्लिकवर, नवी मुंबई पालिकेच्या विशेष पोर्टलवर सुविधा

नागरिकांना आपल्या घरापासून जवळ सुलभपणे कोरोना प्रतिबंधक लस घेता यावी म्हणून नवी मुंबई महापालिकेने 2 ड्राईव्ह इन केंद्रांसह 78 लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत.

लसीकरणाची माहिती एका क्लिकवर, नवी मुंबई पालिकेच्या विशेष पोर्टलवर सुविधा
SHARES

नागरिकांना आपल्या घरापासून जवळ सुलभपणे कोरोना प्रतिबंधक लस घेता यावी म्हणून नवी मुंबई महापालिकेने 2 ड्राईव्ह इन केंद्रांसह 78 लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. सध्या लसींच्या उपलब्धतेनुसार दररोज लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात येत आहे. 

दुसऱ्या दिवशी कोणत्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार आहे याची माहिती प्रत्येक केंद्रांवर उपलब्ध असणाऱ्या लसींच्या डोस संख्येसह आदल्या दिवशी संध्याकाळी महानगरपालिकेच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांव्दारे तसंच व्हॉट्स अपव्दारे प्रसिध्द करण्यात येत आहे.

याशिवाय नागरिकांना लसीकरणाविषयीची माहिती अधिक सुलभपणे उपलब्ध व्हावी यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या https:/www.nmmccovidcare.com या विशेष पोर्टलवर अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 नागरिक https:/www.nmmccovidcare.com या वेबसाईटवरील COVID-19 VACCINATION या सेक्शनवर क्लिक करून महानगरपालिकच्या कोणत्या लसीकरण केंद्रांवर, कोणत्या लसीचे, किती डोस, कोणत्या वयोगटासाठी, कोणत्या वेळेत उपलब्ध आहेत अशी सर्व माहिती सहजपणे जाणून घेऊ शकतात व त्यानुसार आपल्या लसीकरणाचे नियोजन करू शकतात.

विशेष म्हणजे नागरिकांनी निवडलेल्या लस उपलब्ध असलेल्या त्यांच्या नजिकच्या लसीकरण केंद्रांवर सहज पोहचता यावे याकरिता लसीकरण केंद्राचा पत्तादेखील या पोर्टलवर गुगल मॅपव्दारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता दुसऱ्या दिवशीच्या लसीकरण सत्राची माहिती या विशेष पोर्टलवर अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पोर्टलला भेट देऊन त्यानुसार आपल्या लसीकरणाचे सुलभपणे नियोजन करता येणार आहे. 

 नवी मुंबईत आतापर्यंत 6 लाख 22 हजार 407 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 1 लाख 70 हजार 417 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा