फराळासाठी चणाडाळ खरेदी करताय? जरा काळजी घ्या

 Mumbai
फराळासाठी चणाडाळ खरेदी करताय? जरा काळजी घ्या

मुंबई - दिवाळीत मिठाई, लाडू, फरसाण आणि अन्य पदार्थांसाठी तुम्ही चणाडाळ घेताय मग सावधान. तुमची फसवणूकही होऊ शकते. नवी मुंबईतल्या चार गोदामांवर छापा टाकून एफडिएनं पावणे तीन कोटीची निकृष्ठ रशियन चणाडाळ जप्त केलीय. गेल्या एक वर्षापासून ही डाळ न्हावा शेवा बंदरावर पडून होती. ही रशियन चणाडाळ दिल्लीच्या एका कंपनीनं मुंबईत विक्रीसाठी आणल्याची माहिती एफडिएला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

Loading Comments