Advertisement

कोरोनाची लागण झालेली महिला रुग्णालयातून पळाली

कोरोनाची लागण झालेल्या महिला रुग्णाने आपल्या पतीसह रुग्णालयातून पळ गाठल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

कोरोनाची लागण झालेली महिला रुग्णालयातून पळाली
SHARES

कोरोनाची लागण झालेल्या महिला रुग्णाने आपल्या पतीसह रुग्णालयातून पळ गाठल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील एका रुग्णालयातून हा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही महिला रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होती. रुग्णालयातून पळून जाऊन ही महिला रायगडमधील आपल्या गावी गेली. मात्र, आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली.

सोमय्या रुग्णालयात उपचार सुरू असताना या ३५ वर्षीय महिलेला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत होते. याच संधीचा फायदा घेत महिला तेथून बाहेर पडली आणि नवऱ्याला घेऊन ती महाडमधील रायगडच्या किल्ल्याच्या  पायथ्याशी असलेल्या करमर या आपल्या गावी पोहोचली. ही महिला गर्भवती आहे. धक्कादायक म्हणजे दोघेही मोटारसायकलवरून गावी गेले. तिच्याकडील कागदपत्र तपासली असता ती कोविड पॉझिटीव्ह असल्याची बाब आरोग्य यंत्रणेच्या लक्षात आली.

तिच्या पतीच्या अहवालाबाबत अद्याप संभ्रम आहे. आता दोघांना महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार प्रशासनाने गांभीर्याने घेतला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिले आहेत.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा