Advertisement

मुंबईत पाचवं सेरो सर्वेक्षण सुरू

पाचव्या सेरो सर्वेक्षणात सर्व वयोगटातील व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण १५ ऑगस्टपर्यंत संपण्याची शक्यता आहे.

मुंबईत पाचवं सेरो सर्वेक्षण सुरू
SHARES

मुंबईत पाचवे सेरो सर्वेक्षण सुरू झाले आहे. या सेरो सर्वेक्षणात मुंबईतील आठ ते दहा हजार व्यक्तींचे नमुने घेतले जाणार आहेत. मुंबईतील २४ विभागांमध्ये सेरो सर्वेक्षण केलं जात आहे.

मुंबई महापालिकेने आतापर्यंत चार हजार नमुने घेण्याचे ठरविले होते. मात्र, आता पालिकेने यामध्ये वाढ करून आठ ते दहा हजार नमुन्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाचव्या सेरो सर्वेक्षणात सर्व वयोगटातील व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण १५ ऑगस्टपर्यंत संपण्याची शक्यता आहे. या आधी मुंबईत चार सर्वेक्षणे झाली असून नुकतेच बालकांचेही सर्वेक्षण पालिकेने केले.

मागील सर्वेक्षणात खासगी आणि सरकारी प्रयोगशाळेत इतर आजारांच्या तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांच्या प्रतिपिंड चाचण्या केल्या होत्या. परंतु काही भागांमध्ये मात्र याला प्रतिसाद मिळत नसल्याने या वेळेस पालिकेच्या, सरकारी आणि खासगी रुग्णालयांत, दवाखान्यांत इतर आजारांच्या उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे नमुने घेतले जात आहेत. त्यांच्या प्रतिपिंड चाचण्या केल्या जाणार आहेत.

रुग्णसंख्या वाढीसह मृत्यूची कारणे, इतर आजारांचा प्रभाव यांचा अभ्यास करण्यासाठी पालिकेने झोपडपट्ट्या, मध्यमवर्ग आणि उच्चभ्रू वर्ग यांचा समावेश असलेल्या प्रत्येकी दोन अशा सहा विभागांमध्ये विश्लेषणात्मक अभ्यास हाती घेतला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा