Advertisement

मुंबईतील माझगाव परिसरातील इमारतीला भीषण आग, दोघांची सुखरूप सुटका

मुंबईतील माझगाव परिसरातील सेंट मेरी रोडवरील (mazgaon sent mery road) एका रेसिडेन्शियल (fire) टाॅवरला सोमवार १८ मे रोजी दुपारी भीषण आग लागली

मुंबईतील माझगाव परिसरातील इमारतीला भीषण आग, दोघांची सुखरूप सुटका
SHARES

 मुंबईतील माझगाव परिसरातील सेंट मेरी रोडवरील (mazgaon sent mery road) एका रेसिडेन्शियल (fire) टाॅवरला सोमवार १८ मे रोजी दुपारी भीषण आग लागली. (Fire breaks out at a residential building in Mazgaon area in Mumbai. Four fire engines are present at the spot) शिरिन मंझिल असं या टाॅवरचं नाव आहे. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर ७ जण अडकल्याचं म्हटलं जात असून या सर्वांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तर आतापर्यंत दोघांना आगीच्या तावडीतून वाचवण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे.  

माझगावच्या सेंट मेरी रोडवरील ग्राऊंड फ्लोअर अधिक ७ मजल्यांच्या या टाॅवरमधील सहाव्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास आग लागल्याचं म्हटलं जात आहे. ही आग लेव्हल २ ची आहे. या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे जवान ४ अग्निशमन बंब आणि एक रुग्णवाहिका घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघा जणांना इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून आगीच्या तावडीतून सहीसलामत बाहेर काढलं. 

तर सातव्या मजल्यावर अडकलेल्या इतर ७ जणांनाही बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जात आहे. या इमारतीत एकूण किती लोकं अडकले आहेत? याबाबत अजून तरी अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. तसंच फ्लॅटमधून धुराचे लोळ बाहेर येत असल्याने मदतकार्यात अडचणी येत असल्याचंही म्हटलं जात आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा