डेंग्यूपासून कसा बचाव कराल?

मुंबई - डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी 1 ते 25 सप्टेंबरपर्यंत मुुंबईत 296 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे पालिकेच्या अहवालातून समोर आले आहे. ऐन पावसाळ्यातच डेंग्यूने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कसा होतो डेंग्यू ?

डेंग्यू हा विषाणूजन्य आजार

एडीस इजिप्ती आणि एडीस अलबोपिक्टस डासांच्या चाव्यामुळे होतो डेंग्यू

एडीस इजिप्ती आणि एडीस अलबोपिक्टस डासांवर पांढरे पट्टे असतात.

डेंग्यूची मादी स्वच्छ पाण्यात अंडी घालते.

मोठ्या प्रमाणात डेंग्यूची पैदास ही साठलेल्या पाण्यात होते.

डेंग्यूची मुख्य लक्षणे

ताप

डोकेदुखी

सांधेदुखी

भूक न लागणे

रक्ताची किंवा सुकी उलटी होणे

तहान लागणे

तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे

अंगावर लाल पुरळ येणे

काय काळजी घ्याल ?

वातानुकूलन यंत्र, फ्रीज स्वच्छ करा

मनी प्लांट, फ्लॉवर पॉटमध्ये पाणी जमा होऊ देऊ नका

जुने टायर, थर्माकोल, जुने हेल्मेट, भंगार घरातून हद्दपार करा

डासप्रतिबंधक जाळ्या बसवून घ्या

काय उपचार कराल ?

त्वरित डॉक्‍टरांशी संपर्क साधा

रक्तस्राव असेल तर रुग्णालयात दाखल करणे

फळं खाण्यावर भर द्या

हलका आहार घेणे

डॉक्‍टरांना विचारल्याशिवाय अधिक गोळ्यांचे सेवन टाळा

Loading Comments