खाद्यपदार्थ आणि पेयजलांची होणार तपासणी

 Mumbai
खाद्यपदार्थ आणि पेयजलांची होणार तपासणी
Mumbai  -  

मुंबई - मुंबईत येत्या पावसाळयात आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उघड्यावरील खाद्यपदार्थ तसेच पेयपदार्थ विक्रेत्यांकडील पदार्थ, बर्फ, पाणी इत्यादींची नमूना चाचणी नियमीतपणे करावी आणि या चाचणीत अयोग्य ठरणाऱ्या नमुन्यांबाबत त्वरीत आणि कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिले आहेत.

महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या संस्थांच्या मालकीच्या जमिनी वा इमारती आहेत. या इमारतींमध्ये देखील आवश्यक ती सर्व काळजी घेतली जावी, विशेष करून या परिसरांमध्ये पाणी साचणार नाही याचीही दक्षता प्रभावीपणे घेतली जावी, यासाठी सर्व संबंधित संस्थांना पत्र द्यावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. परंतु नोटीस देऊनही जर संबंधित संस्थांकडून आवश्यक ती कारवाई केली जात नसेल तर त्या संस्थेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Loading Comments