Advertisement

मुंबईत मलेरियाचे ४ हजार, लेप्टोचे २६६ रुग्ण

मुंबईत अवकाळी पावसानं उशिरापर्यंत हजेरी लावल्यानं साथीच्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे.

मुंबईत मलेरियाचे ४ हजार, लेप्टोचे २६६ रुग्ण
SHARES

मुंबईत अवकाळी पावसानं उशिरापर्यंत हजेरी लावल्यानं साथीच्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. या साथीच्या आजारामुळं मुंबईकरांच्या प्रकृतीत बिघाड झाला असून, अनेकांचा मलेरिया, लेप्टो व इतर आजारांचा सामना करावा लागला आहे. यंदाच्या वर्षभरात मुंबईत मलेरियाच्या ४ हजार ११० रुग्णांची, तर लेप्टोच्या २६६ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली. लेप्टोच्या ११ रुग्णांचा मृत्यू ओढावला, तर मलेरियाचा एकही बळी गेला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

मलेरियाच्या रुग्णांची संख्या कमी

गेल्या २ वर्षांच्या तुलनेत यंदा मलेरियाच्या रुग्णांची संख्या कमी आहेत. मुंबई व उपनगरात २०१७ साली ६ बळी आणि ६ हजार १९ रुग्णांची संख्या होती, तर २०१८ साली ३ बळी आणि ५ हजार ५१ रुग्ण होते. २०१० सालापासून मलेरियाच्या शून्य मृत्यू धोरणासाठी पालिकेचा आरोग्य विभाग काम करत आहे. २०१० सालापासून मुंबई व उपनगरात ८० हजार रुग्ण आणि १४५ मृत्यूंची नोंद आहे.

३२ नवे रुग्णांची

यंदाच्या वर्षभरात लेप्टोची २६६ जणांना लागण झाली, तर ११ मृत्यूंची नोंद झाली. २०१८ साली १२ बळी आणि २१८ रुग्णांची नोंद झाली होती. परतीच्या पावसामुळं लेप्टोच्या ३२ नव्या रुग्णांची नोंद नोव्हेंबर महिन्यात करण्यात आली. मागील वर्षी ही संख्या ११ एवढी होती. पावसाळ्यात लेप्टोची समस्या मागील काही वर्षांत गंभीर झाली आहे. त्यात २०१५ साली १६ जुलै या एकाच दिवशी १९ जणांचा लेप्टोने बळी घेतला होता.

लेप्टोवर नियंत्रण

मागील २ वर्षांत पालिकेच्या आरोग्य विभागानं लेप्टोवर नियंत्रण मिळविण्यासाठी पावसाच्या पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार केले. तसंच, घरोघरी जाऊन राबविलेल्या आरोग्य मोहिमा, तपासण्या आणि जनजागृती केली होती.



हेही वाचा -

'हे' घेणार मंत्रिपदाची शपथ, राजभवनाने केली यादी जाहीर

आदित्य ठाकरे घेणार मंत्रिपदाची शपथ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा