Advertisement

मोठी बातमी : १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोना लस

देशात १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

मोठी बातमी : १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोना लस
SHARES

देशात १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस फक्त सरकारी केंद्रांवरच मोफत दिली जाईल. तर खासगी हॉस्पिटल्समध्ये शुल्क आकारलं जाणार आहे. 

६० पेक्षा जास्त वय असणारे नागरिक तसंच इतर व्याधी असणाऱ्या ४५ हून अधिक वयाच्या नागरिकांचं १ मार्चपासून लसीकरण केलं जाणार, असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. या लसीकरणात १० कोटी नागरिकांना डोस दिला जाणार आहे.  लसीकरण मोहीमेत १० हजार सरकारी केंद्रांवर लस दिली जाईल.

प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं की, ज्यांना खासगी रुग्णालयातून लसीकरण करुन घ्यायचं आहे त्यांना पैसे भरावे लागतील. यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचा निर्णय आरोग्य मंत्रालय पुढील तीन ते चार दिवसांत घेईल. आतापर्यंत १,०७,६७००० नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर १४ लाख नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 

दरम्यान, करोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून तीन सदस्यीय पथकं पाठवण्यात आली आहेत. महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीरमध्ये ही पथकं पाठवण्यात आली आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा