Advertisement

घाटकोपरमध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन


घाटकोपरमध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन घाटकोपरमध्ये करण्यात आलं आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांच्या वतीने 9 एप्रिलपासून ते 15 एप्रिलपर्यंत हे आरोग्य शिबीर राबवण्यात आलं आहे. या शिबिरात नेत्र रोग, ह्रदय रोग, नाक-कान-घसा, स्त्री रोग, मेंदू विकार, जनरल सर्जरी आणि अस्थिव्यंगोपचार यांसारख्य रोगांवर तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच दिव्यांग कृत्रिम अवयव, मूत्र रोग, गतिमंद रुग्ण, रेडीओलॉजी, क्षय रोग, किडनी विकार, कर्क रोग या रोगांवर देखील मोफत तपासणी आणि औषधोपचार करण्यात येणार आहेत.

पार्क साईट, वर्षानगर, नटेश्वर स्पोर्ट्स् क्लब, गणेश मैदान, भिमनगर, शिवसागर, अल्ताफ नगर, मुक्तबाई रुग्णालयाजवळ, भटवाडी, दिशा रुग्णालयाजवळ, पारशीवाडी आणि आझादनगर अशा घाटकोपरमधील एकूण 12 ठिकाणी हे भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलंय. या शिबिरात 2 लाखांपर्यंतची शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. या भव्य शिबिरामुळे मध्यमवर्गीय नागरिकांच्या संपूर्ण आरोग्याची तपासणी करण्यात आली. शिवाय एखाद्या रुग्णाकडे त्याला जडलेल्या रोगाच्या इलाजासाठी पुरेसे पैसे नसल्यास मोफत शस्त्रक्रिया आणि इलाज येथे केला जात असल्याचं स्थानिक नागरिक नंदा चाळके यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा