• मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
  • मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
  • मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
SHARE

वांद्रे - पालिका निवडणूक जसजसी जवळ येऊ लागली तसतसे इच्छुक उमेदवार लोकांकडे पोहोचण्यासाठी प्रयत्न करू लागलेत. वांद्रे येथील बाजार रोड येथे स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्या फेमिदा पानवाला डिसल्वा यांनी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केलं होतं.

डायबिटीज चेक अप, हार्ट, ब्लड प्रेशर, यांसारख्या विविध आजारांचं मोफत चेक करण्यात आलं. याशिबिरात जवळपास 300 लोकांनी सहभाग घेतला. वॉर्ड क्र. 102 मधून फेमिदा पानवाला डिसल्वा या तयारी करत आहेत. त्यासाठी त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. आपण निवडूण आलो तर दर रविवारी अशा प्रकारची आरोग्य शिबीर आयोजित करू अशी प्रतिक्रीया फेमिदा पानवाला डिसल्वा यांनी दिली. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे सचिव जाहीद खानही उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या