Advertisement

मुंबईभर धर्मादाय आयुक्तांची एकदिवसीय मोफत उपचार मोहीम


मुंबईभर धर्मादाय आयुक्तांची एकदिवसीय मोफत उपचार मोहीम
SHARES

झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब किंवा रस्त्यावर राहणाऱ्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये जाऊन अनेकदा पैशाअभावी उपचार घेणं शक्य होत नाही. त्यासाठी महापालिकेची रुग्णालये तर आहेतच, पण रांगेत उभं राहून अनेकदा लोकांचा बराच वेळ जातो. त्यामुळे उपचार घेण्यासाठी अनेकदा टाळाटाळ केली जाते. शिवाय, खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेणं तर परवडणारच नसतं. याच पार्श्वभूमीवर धर्मादाय रुग्णालयातील डॉक्टरांनी रस्त्यावर आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब लोकांना मोफत उपचार देण्याचं ठरवलं.

धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी ‘धर्मादाय रुग्णालय तुमच्या दारी’ ही मोहीम अशा रुग्णांसाठी राबवली, ज्यांना खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेणं शक्य होत नाही. यात मुंबईतील एकूण 74 रुग्णालयांपैकी ठाण्यातील 7 आणि 2 खासगी रुग्णालयांचा समावेश होता.



शनिवारी सकाळी 10 ते 2 अशी ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत रुग्णांवर प्राथमिक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यासाठी एक रुग्णवाहिका, काही डॉक्टर्स आणि त्याचसोबत काही प्रमाणात औषध अशी सुविधा करण्यात आली होती. शिवाय, आपातकालीन परिस्थितीत असणाऱ्या रुग्णाला रुग्णालयात दाखल देखील करण्यात येणार होतं.


गरीब रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, हा या मोहिमेचा मुख्य हेतू होता. रुग्णांना विश्वास वाटला पाहिजे की धर्मादाय रुग्णालयात जाऊनसुद्धा ते उपचार घेऊ शकतात. या मोहिमेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. शिवाय या मोहिमेविषयी जनजागृती झाली पाहिजे. मुंबईसह महाराष्ट्रातही ही मोहीम आम्ही राबवणार आहोत.

शिवकुमार डिगे, धर्मादाय आयुक्त



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा