डेंग्यूमुळे विक्रेत्यांची चांदी

    मुंबई  -  

    मुंबई - आजारपणं म्हटलं की घरगुती, आयुर्वेदिक उपचाराचे डोस मिळतच असतात. डेंग्यूच्या रुग्णांनाही असेच काहीसे सल्ले दिले जातायेत. तुम्हाला डेंग्यू झालाय? मग पपईचा रस, ड्रॅगन फ्रूट आणि किवीची फळं खा, असे सल्ले दिले जातात. डेंग्यूच्या रुग्णांनी या फळांचे सेवन केल्यास कमी झालेल्या रक्त पेशी वाढतात, असा समज पसरतोय. मात्र या मागे किती सत्य आहे, याची पडताळणी करणेही आवश्यक आहे. ऐवढंच काय तर आता पपई, ड्रॅगन फ्रूट आणि किवीच्या फळांच्या गोळ्याही बाजारात उपलब्ध आहेत. ही फळे खाऊन रुग्णांना किती फायदा होतो? माहीत नाही, पण फळविक्रेत्यांना याचा चांगलाच फायदा होताना दिसतोय.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.