Advertisement

महापालिका रुग्णालयांमध्ये ‘प्रधानमंत्री जन औषधी केंद्रे’


महापालिका रुग्णालयांमध्ये ‘प्रधानमंत्री जन औषधी केंद्रे’
SHARES

भारत सरकारच्यावतीने राबवण्यात येणारी ‘प्रधानमंत्री जन औषधी केंद्रे’ महापालिकेच्याही रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये याबाबतचा ठराव करण्यात आला असून, याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाकडून पाऊल उचलले जाणार आहे.

प्रधानमंत्री जन औषधी योजनेंतर्गत भारत सरकारच्यावतीने ‘प्रधानमंत्री जन औषधी केंद्रे’ सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये उच्च प्रतीची औषधे, उपकरणे इत्यादी जनसामान्यास किफायतशीर किंमतीमध्ये उपलब्ध केली जातात. त्यामुळे महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये ‘प्रधानमंत्री जन औषधी केंद्र’ योजनेंतर्गत तात्काळ ‘प्रधानमंत्री जन औषधी’ योजनेतंर्गत तात्काळ ही केंद्रे सुरू करण्यात यावीत. जेणेकरून त्याचा फायदा सर्वसामान्य गरीब गरजू रुग्णांना होऊ शकेल, अशी मागणी भाजपा नगरसेवक संदीप दिलीप पटेल यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

या योजनेंतर्गत दिली जाणारी औषधे मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब इत्यादी रोगांवरील दुर्मिळ औषधे आणि इतर 500 हून अधिक औषधे तसेच मोठ्या शस्त्रक्रीयेसाठी लागणारी महत्वाची उपकरणे सवलतीच्या दरात उपलब्ध केली जाते. या सवलतीच्या योजनेमध्ये आषधे आणि उपकरणांच्या किंमतीत सुमारे 75 टक्के सूट दिली जाते. याचा फायदा गरीब आणि गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात होऊ शकेल,असे संदीप पटेल यांनी स्पष्ट केले. याला पाठिंबा देता अभिजित सामंत यांनी महापालिकेच्या रुग्णालयांसह दवाखाने, आरोग्य केंद्र यामध्ये अशी केंद्र सुरू करण्यात यावी,अशी मागणी केली. मुंबईत सध्या 3 ‘प्रधानमंत्री जन औषधी केंद्र’ आहेत. त्यामुळे अशाप्रकारे केंद्र सुरू केल्यास याचा फायदा गरीब गरजू रुग्णांना होणार आहे,असे सांगितले. त्यामुळे ही ठरावाची सूचना मंजूर पुढील कार्यवाहीसाठी महापौर विश्वानाथ महाडेश्वर यांनी महापालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा