Advertisement

१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य द्या

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण १ मे रोजी सुरू झाले. त्याप्रमाणे कोविशिल्ड घेणाऱ्यांचा ८४ दिवसांचा कालावधी २४ जुलै रोजी पार पडला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य द्या
SHARES

जीवघेण्या कोरोना व्हायरसनं (coronavirus) भारतासह संपुर्ण जगभरात थैमान घातलं असून, अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. परंतू, या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व त्याला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण (corona vaccination) केलं जात आहे. त्यानुसार लसीचे प्रत्येकी २ डोस दिले जात आहेत. मात्र, लसीच्या २ डोसमधील अंतर हे ८४ दिवस असून अनेक जण दुसरा डोस घेत आहेत. दरम्यान, मुंबईसह राज्यात १ मे २०२१पासून १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं. त्यानुसार आता या नागरिकांना ८४ दिवस पुर्ण होत असल्यानं त्यांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण १ मे रोजी सुरू झाले. त्याप्रमाणे कोविशिल्ड घेणाऱ्यांचा ८४ दिवसांचा कालावधी २४ जुलै रोजी पार पडला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याच्या आरोग्य विभागानं जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाला राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोसला (second does) प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ९५ लाख लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. आरोग्य विभागाने सर्व वयोगटातील लोकांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा आणि तालुका पातळीवरील प्रशासनाला कळविला आहे.

लसींचे मिळालेल्या डोसचे वर्गीकरण कशा स्वरूपात केले जावे, याचा संपूर्ण अधिकार स्थानिक प्रशासना आहे. सध्या मुंबई महापालिकेनं (bmc) ६० टक्के लसींचा साठा दुसऱ्या डोसकरिता तर ४० टक्के लसींचा साठा पहिल्या डोससाठी राखीव ठेवला आहे. मुंबईत १८ ते ४४ वयोगटातील २२.३ लाख जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ७५ हजार जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना २८ दिवसांनी दुसरा डोस मिळत आहे.



हेही वाचा - 

२ ऑगस्टपासून सुरू होणार अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींचं लसीकरण

महापालिका निवडणुकीसाठी मनसे-भाजप युती होणार?


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा