Advertisement

महापालिका निवडणुकीसाठी मनसे-भाजप युती होणार?

येत्या वर्षात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असून, निवडणुकीसाठी मनसे व भाजप यांची युती होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी मनसे-भाजप युती होणार?
SHARES

येत्या वर्षात मुंबई महापालिकेची (bmc) निवडणूक होणार असून, निवडणुकीसाठी मनसे (mns) व भाजप (bjp) यांची युती होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांची अलीकडेच नाशिकमध्ये (nashik) भेट झाली. चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर आता माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे राज ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यामुळं मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळं आता येत्या निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र लढणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महापालिका निवडणुकीकरीता (bmc election) भाजप-मनसे एकत्र येणार का? या प्रश्नावर भाजप नेते चंद्रकांत पाटील काही दिवसांपूर्वी एक विधान केलं होत. त्यानुसार त्यांनी उत्तर भारतीयांबाबत भूमिका राज यांना स्पष्ट करावी लागेल, असे म्हटलं होतं. नाशिकमध्ये झालेल्या दोघांच्या भेटीतही परप्रांतीयांचा विषय निघाला होता आणि या बाबतची आपली भूमिका स्पष्ट करणाऱ्या काही क्लिप्स आपण पाठवू, असं राज यांनी नाशिकच्या भेटीत पाटील यांना सांगितल्याचं म्हटलं जातंय. शिवाय या चर्चेनुसार क्लिप्सही राज ठाकरे यांनी पाटील यांच्याकडे पाठविल्या आहेत. या क्लिप्सचा अभ्यास आपण करणार आहोत, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) हे राज यांना भेटणार आहेत. राज यांचा मला फोन आला होता, आम्ही लवकरच भेटू. भाजप आणि मनसेची युती झाली तर त्यात गैर काय? समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर त्यात गैर काय? भविष्यात काँग्रेस (congress) आणि भाजप सोडून कोणीही एकत्र येऊ शकतो, असे मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.हेही वाचा -

मुंबई महापालिकेचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा