Advertisement

मुंबई महापालिकेचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ओढवलेल्या पूरस्थितीमुळं बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची २ पथकं कोकणात दाखल झाली.

मुंबई महापालिकेचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
SHARES

मागील २ दिवसांपूर्वी मुंबईसह (mumbai) राज्यभरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं मुंबईची तुंबई झाली असून राज्यात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, या राज्यातील कोकण विभागात मोठ्या प्रमाणात पुरस्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका येथील जनतेला चांगलाच बसला. पुरस्थिती निर्माण झाल्यामुळं घरातील सर्व समान पुराच्या पाण्यात वाहून गेलं. घरात चिखल असल्यामुळं राहायचं कसं असा प्रश्न या पुरग्रस्तांना पडला आहे. मात्र, अशा परिस्थितीत या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई महापालिकेनं पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात (maharashtra) ओढवलेल्या पूरस्थितीमुळं बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची २ पथकं कोकणात दाखल झाली.

रविवारी रायगड आणि कोल्हापूर येथे रवाना झाली. या पथकांचं नियोजन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. रायगड इथं गेलेल्या पथकात २ वैद्यकीय चमू, १ फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे ७५ कर्मचारी, पाण्याचे ४ टँकर, १ टोइंग लॉरी इत्यादींचा समावेश आहे.

वैद्यकीय बाबींचे व्यवस्थापन पालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी करत आहेत. तर आपत्कालीन व्यवस्थापनविषयक कार्यवाही पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर करत आहेत. कोल्हापूर येथील पूर बाधित परिसरातील पर्जन्यजल वाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्यांविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. या पथकासोबत रिसायकल मशीन आणि इतर आवश्यक यंत्रसामग्री पाठवण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपमुख्य अभियंता सुनील सरदार यांचीही मदत घेतली जात आहे.




हेही वाचा -

राज्याला ड्रायव्हर नको, जनतेचं हित बघणारा मुख्यमंत्री हवाय- नारायण राणे

सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी वधारले


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा