Advertisement

गूड न्यूज ! मुंबईत गुरूवारी ५ हजार ९०३ जणांनी केली कोरोनावर मात

मुंबईत गुरूवारी दिवसभरात ५९०३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५० हजार ६९४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

गूड न्यूज ! मुंबईत गुरूवारी ५ हजार ९०३ जणांनी केली कोरोनावर मात
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १२५ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १५५४ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत गुरूवारी दिवसभरात ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-खासगी रुग्णवाहिकांकडून होणारी लूट आता थांबणार, खासगी रुग्णवाहिका शासन ताब्यात घेणार

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७५ रुग्ण दगावले आहेत. तर २७ जून रोजी ४१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २६ जून रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, गुरूवारी मुंबईत कोरोनाचे १५५४ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ८० हजार २६२ इतकी झाली आहे. राज्यात आज १ लाख १ हजार १७२ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत गुरूवारी दिवसभरात ५९०३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५० हजार ६९४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- 'बेस्ट'ला दररोज ८० लाखाहून अधिक उत्पन्न

आज सोडण्यात आलेल्या ८०१८ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ७०३३ (आतापर्यंत एकूण ७२ हजार २८५) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४७७ (आतापर्यंत एकूण १४ हजार ३१५), नाशिक मंडळात ३३२ (आतापर्यंत एकूण ५६०२), औरंगाबाद मंडळ ९३ (आतापर्यंत एकूण ३२१४), कोल्हापूर मंडळ १२ (आतापर्यंत एकूण १५५६), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ७०२), अकोला मंडळ ३१ (आतापर्यंत एकूण १९६४), नागपूर मंडळ ३३ (आतापर्यंत एकूण १५३४) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत. २९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा तेवढ्याच विक्रमी संख्येन रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून दि. १५ जून रोजी एकाच दिवशी ५०७१, दि.२४ जून रोजी ४१६१ आणि दि. २५ जून रोजी ३६६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जूनमध्ये एकाच महिन्यात १२ हजार ८९३ एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. गेल्या काही महिन्यापासून सातत्याने राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५१ ते ५३ टक्क्यांच्या आसपास राहीला आहे. राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा