SHARE

देवनार - जागतिक व्यंगत्व दिनाच्या निमित्तानं देवनार कॉलनी येथील स्पंदन रुग्णालयात रविवारी दिव्यांग मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी याठिकाणी आरोग्य तपासणीसाठी शंभरपेक्षा अधिक मुलांनी हजेरी लावली होती. एम.बी. बरवालिया फाउंडेशन तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध डॉक्टरांनी या मुलांची तपासणी करुन मुलांना औषधे देखील मोफत दिली. गेल्या अनेक वर्षांपासून या फाउंडेशन कडून अशा प्रकारे मोफत आरोग्य शिबीर भरवण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयातील सल्लागार आर. सानप यांनी दिली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या