Advertisement

शासकीय दंत महाविद्यालयात पॅनॉरॉमिक एक्स-रे मशिन सेवा


शासकीय दंत महाविद्यालयात पॅनॉरॉमिक एक्स-रे मशिन सेवा
SHARES

सध्या वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात 2 डिजिटल पॅनॉरॉमिक एक्स-रे मशिन बसवण्यात आलं आहे.

मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालयात दिवसाला फक्त एका ओपीडीत जवळपास 100 ते 150 रुग्ण येतात. त्यामुळे एका वेळेस अनेक रुग्णांना सांभाळणं कठीण होतं. आता हे मशिन वापरल्यामुळे रुग्णांच्या दातांवर आणखी चांगल्या पद्धतीने उपचार करता येईल आणि वेळही वाचेल, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे.



या मशिन्स महाविद्यालयातील मुखरोग निदान आणि क्ष-किरण विभाग तसंच दंतव्यंगोपचार विभाग या ठिकाणी बसवण्यात आल्या आहेत.

या दोन्ही अत्याधुनिक मशिनचा लोकार्पण सोहळा गुरुवारी झाला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिष महाजन यांच्या हस्ते या लोकार्पण सोहळ्याचं आणि थ्री डी कार्यशाळेचं उद्धाटन करण्यात आलं.

या मशिन्सचा फायदा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी देखील केला जाणार आहे. यासोबतच रोगाचं अचूक निदान आणि उपचारांचं नियोजन करण्यासाठी या मशिन्सचा वापर केला जाईल. या मशिनमुळे तोंडाचा जबडा ही चांगल्या पद्धतीने दिसेल. त्यामुळे तोंडात असणारा त्रास आम्हाला कळू शकेल. डिजिटल ‘क्ष’-किरण या पद्धतीमध्ये रुग्णांना क्ष-किरणांची कमीत कमी बाधा होईल.

डॉ. मानसिंग पवार, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय




या दोन्ही अत्याधुनिक पॅनॉरॉमिक मशिन्सचा खर्च 50 लाख एवढा आहे. डिजिटल क्ष-किरण या पद्धतीत संगणकाचा वापर करुन कमीत कमी क्ष-किरणांची बाधा होईल असं ही रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, या मशिनमुळे काढलेल्या एक्स-रे चा खर्च सर्वसामान्यांना परवडेल असा म्हणजे 150 रुपये आणि साध्या एक्स-रे साठी 25 रुपये एवढा आहे.


महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त रूग्णांची तपासणी करण्यात आलीये. तसेच महाराष्ट्र शासनाकडून दंतशाखेतील शिक्षकांचे समावेशन व पदोन्नती करण्यात आली असून रिक्त पदे देखील भरण्यात आली आहेत. शिवाय अजून काही पदे भरण्यात येतील.

गिरीष महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री



पॅनॉरॉमिक एक्स रे मशिनविषयी...


पॅनॉरॉमिक एक्स- रे मशिनचा वापर संपूर्ण तोंडाच्या रोगाच्या निदानासाठी केला जातो. या मशिनमुळे तोंडाचा जबडा, दात हे एकाच एक्स-रे मध्ये दिसते. ज्यामुळे तोंडाच्या आजाराविषयी निदान होतं.

पॅनॉरॉमिक एक्स रे मुळे  डॉक्टरांना तोंडाच्या कुठल्याही भागातील आजारावर उपचार करणं सोपं होऊ शकेल. तोंडाच्या वरचा आणि खालच्या भागात असणाऱ्या आजारांचंही निदान अगदी अचूकपणे होण्यासाठी हे मशिन मदत करतं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा