५०० वर्षांच्या जुन्या पद्धतीनं 'तिला' मिळालं नवं नाक!

जी. टी. हाॅस्पिटलच्या डॉक्टरांनी ५०० वर्षांपूर्वीच्या 'टॅग्लिआकॉझी' शस्त्रक्रीया पद्धतीचा वापर करत १८ वर्षांच्या मुलीला नव नाक मिळवून दिलं.

  • ५०० वर्षांच्या जुन्या पद्धतीनं 'तिला' मिळालं नवं नाक!
SHARE

शरीरातील एखाद्या अवयवयात जरी व्यंग असला, तरी संबंधित व्यक्तीच्या आत्मविश्वासावर त्याचा परिणाम होतो. त्यातही चेहरा बेढब असेल, तर त्याचा मोठा परिणाम त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर होतो. असाच काहीसा प्रकार कोमल ढाले या १८ वर्षीय मुलीसोबत होता होता. कोमलच्या नाकाच्या एका बाजूची नाकपुडी जन्मत:च नव्हती. यामुळे तिचं कुटुंबिय चिंतेत होतं.

अहमदनगर आणि लातूर अशा दोन ठिकाणी कोमलच्या नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी प्रयत्न करण्यात आले. पण ते प्रयत्न व्यर्थ गेले. शेवटी कोमलच्या कुटुंबियांना तिथल्या डॉक्टरांनी मुंबईतील जी. टी. या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, कोमलला नव्याने नाक कशापद्धतीने देता येईल, याचा विचार जी.टी हॉस्पिटलमधील सर्जन आणि डॉक्टरांनी केला.

नाकाची शस्त्रक्रीया करायची असल्यास 'ऱ्हिनोप्लास्टी' सर्जरीचा वापर केला जातो. पण, कोमलवर ही सर्जरी करता येणार नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी ५०० वर्षांपूर्वीच्या 'टॅग्लिआकॉझी' या शस्त्रक्रीया पद्धतीचा वापर केला.काय आहे 'टॅग्लिआकॉझी' शस्त्रक्रीया ?

या शस्त्रक्रीया पद्धतीत एका हातातून रक्तवाहिन्यांसह एक त्वचेची नळी तयार केली जाते. नळीची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत जवळपास ४ आठवडे लागतात. त्याच्याखाली आपल्या शरीरातील सपोर्टसाठी कुठल्या तरी भागाची थोडीशी चामडी लावली जाते. त्यातून रक्तपुरवठा होत असतो. त्यानंतर या नळीच्या एका बाजूचा रक्तप्रवाह कमी केला जातो. आणि ती नळी तीन आठवड्यानंतर नाकाला जोडली जाते. शस्त्रक्रिया करुन नाकाच्या भागात मांसासह तिथे ती नळी फिक्स केली जाते. त्यानंतर त्या रुग्णाला त्याचा हात जवळपास ३ आठवडे तसाच ठेवावा लागतो. त्यानंतर, त्वचेची नळी नाक तयार झाल्यानंतर नाकापासून वेगळी केली जाते. या संपूर्ण शस्त्रक्रियेला एकूण ३ महिने लागतात.  


या मुलीवर आधी दोन वेळ शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्या शस्त्रक्रियेत तिच्या डोक्यावरील मांसाचा वापर केला होता. पण, आमच्याकडे तो पर्याय नव्हता. त्यामुळे आम्ही जुनी शस्त्रक्रिया पद्धत करण्याचं ठरवलं. मी माझ्या २൦ वर्षांच्या करिअर मध्ये चौथ्यांदा ही शस्त्रक्रीया केली आहे. 

- डॉ. नितीन मोकल, ज्येष्ठ प्लास्टिक सर्जन, गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल


टॅग्लिआकॉझी' शस्त्रक्रीया ही इटालियन पद्धत आहे. जवळपास ५൦൦ वर्षांपूर्वी म्हणजेच १५६५ ला पहिल्यांदा गॅसपेअर टॅग्लिआकॉझी या तज्ज्ञाने ही शस्त्रक्रिया पद्धत शोधली होती. शिवाय, त्याकाळी भारतात ही पद्धत पहिल्यांदा वापरली गेल्याचं ही सांगण्यात येतं.हेही वाचा -

चुकीचे लेबलिंग असलेल्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा साठा एफडीएकडून जप्त

अबब ! महिलेच्या पित्ताशयातून निघाले 284 खडे


संबंधित विषय
ताज्या बातम्या