Advertisement

अबब ! महिलेच्या पित्ताशयातून निघाले 284 खडे


अबब ! महिलेच्या पित्ताशयातून निघाले 284 खडे
SHARES

तुम्हाला जर अपचन, जळजळ किंवा उलट्यांचा त्रास सतत होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जर असे केलात तर कदाचित तुमच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येईल. विचारात पडला असाल ना? पण श्रेया शिंदे यांच्यासोबत हे घडले आहे. श्रेया शिंदे यांना देखील गेल्या अनेक वर्षांपासून अपचन, पोटदुखीचा त्रास जाणवत होता. पण, त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर शेवटी शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली.


दुर्बिणीने केली शस्त्रक्रिया

बोरीवलीतील फिनिक्स रुग्णालयात 42 वर्षीय श्रेया शिंदे यांच्यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. श्रेया यांच्या पित्ताशयात तब्बल 284 खडे होते. आपल्या पित्ताशयात एवढे खडे असतील याची थोडी देखील कल्पना श्रेया यांना नव्हती. पाच ते सहा महिन्यांपासून थोडा फार त्रास त्यांना होत होता. मात्र, किरकोळ औषधोपचार करून त्यांनी वेळ मारून नेली.

पण, नंतर त्यांना पोटदुखी, छातीदुखी, जळजळ, अपचनाचा त्रास एवढा वाढला की त्यांना थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं. शनिवारी सकाळी श्रेया यांना त्यांच्या कुटुंबियांनी फिनिक्स रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर सोनोग्राफी केल्यावर त्यांच्या पित्ताशयात खडे असल्याचं निष्पन्न झालं.


श्रेया यांना दाखल केल्यानंतर त्यांची सोनोग्राफी केली तेव्हा कळलं की त्यांच्या पित्ताशयात खडे आहेत. आम्ही दुर्बिणीद्वारे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला जास्त वेळ रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नसते. आता त्यांची प्रकृती ठिक आहे. त्यामुळे आम्ही त्यांना डिस्चार्जही दिला.

- डॉ. सौरव सांगोरे, संस्थापक, फिनिक्स रुग्णालय

शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच संध्याकाळी आम्ही त्यांची शस्त्रक्रिया केली. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून त्यांच्या पित्ताशयातील 284 खडे काढले असंही डॉ. सांगोरे यांनी सांगितलं.


या महिलेला सतत पोटदुखीचा त्रास जाणवत होता. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. सोनोग्राफी केल्यानंतर कळलं की या महिलेच्या पित्ताशयात खडे आहेत. महिला बऱ्याचदा अशा छोट्या-छोट्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यातून अशा घटना घडतात.

- डॉ. नितीन दिवाते, लॅप्रास्कोपिक सर्जन, फिनिक्स रुग्णालय

पित्ताशयातील हे खडे कोलेस्टेरॉलचे आहेत. जे प्रामुख्याने महिलांच्या पित्ताशयात होतात. पण, दुर्लक्ष केल्यामुळे अशा आजारांवर शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय राहत नाही असंही डॉ. दिवाते यांनी सांगितलं.



हेही वाचा - 

केईएममध्ये यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

जे.जे रुग्णालयात पहिली यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा